ठाणे शहरातील शिवसेनेच्या जुन्या शाखा ताब्यात घेणाऱ्या शिंदे गटाला योग्य समज द्या; ठाणे पोलीस आयुक्तांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 07:38 PM2023-02-21T19:38:23+5:302023-02-21T19:39:23+5:30

काही शाखांची मालकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे तर काही पक्ष कार्यालायची मालकी खाजगी मालमत्ता धारकांकडे असून सदर मालमत्तेचा ताबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे.

Give proper understanding to the shindhe faction taking over old branches of Shiv Sena in Thane city; Demand to Thane Police Commissioner | ठाणे शहरातील शिवसेनेच्या जुन्या शाखा ताब्यात घेणाऱ्या शिंदे गटाला योग्य समज द्या; ठाणे पोलीस आयुक्तांकडे मागणी

ठाणे शहरातील शिवसेनेच्या जुन्या शाखा ताब्यात घेणाऱ्या शिंदे गटाला योग्य समज द्या; ठाणे पोलीस आयुक्तांकडे मागणी

googlenewsNext

प्रतिनिधी - आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शाखा बळकावणाऱ्या मिंढे गटाला योग्य समज द्यावी तसेच समाजामध्ये कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी याची दक्षता घ्यावी अशी मागणी ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना पत्राद्वारे करण्यात आली त्यावेळी खासदार राजन विचारे, लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, सचिव संजीव कुलकर्णी, ठाणे युवा सेना अधिकारी किरण जाधव, सहप्रवक्ता तुषार रसाळ, चंद्रभान आझाद, महिला आघाडी रेखा खोपकर, समिधा मोहिते, महेश्वरी तरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमिला भांगे, वैशाली शिंदे, उप शहर  संघटक भारती गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

त्या पत्रामध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून ५६ वर्षामध्ये महाराष्ट्रात अनेक शिवसेना शाखा व कार्यालये सुरु आहेत. त्यापैकी ठाण्यामध्ये हि गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहराच्या विविध भागामध्ये शिवसेनेच्या कार्यालये (शाखा) कार्यान्वयित आहेत. त्यापैकी काही शाखांची मालकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे तर काही पक्ष कार्यालायची मालकी खाजगी मालमत्ता धारकांकडे असून सदर मालमत्तेचा ताबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. असे असताना सुद्धा मिंधे गटाकडून सातत्याने जोर जबरदस्तीने पोलीस बळाचा वापर करून पक्ष कार्यालये (शाखा) बळकावण्यात आलेल्या आहेत. पक्षाशी द्रोह करण्याऱ्या गटाच्या पात्र अपात्रतेचा व नुकताच निवडणूक आयोगाने चुकीच्या घेतलेल्या निर्णयाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा.  बाळासाहेब ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या जुन्या शाखा बळकावण्याचे षडयंत्र गुंडांमार्फत रचले जात आहेत. समाजामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मिंधे गटाला पोलीस यंत्रणेने प्रोत्साहन न देता   योग्य समज द्यावी. अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी मिंधे गटाची व पोलीस खात्याची राहील असे पत्रामध्ये म्हंटले आहे.

Web Title: Give proper understanding to the shindhe faction taking over old branches of Shiv Sena in Thane city; Demand to Thane Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.