पंचतारांकित वसतिगृह दिले, आता पंचतारांकित रुग्णसेवा द्या - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 01:35 PM2023-11-28T13:35:56+5:302023-11-28T13:36:27+5:30

Eknath Shinde: मी ‘शब्द’ दिल्याप्रमाणे तुम्हाला पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले. आता तुम्ही रुग्णांना पंचतारांकित सेवा द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांशी बोलताना केले.

Given five star hostel, now give five star patient care - Eknath Shinde | पंचतारांकित वसतिगृह दिले, आता पंचतारांकित रुग्णसेवा द्या - एकनाथ शिंदे

पंचतारांकित वसतिगृह दिले, आता पंचतारांकित रुग्णसेवा द्या - एकनाथ शिंदे

ठाणे - मी ‘शब्द’ दिल्याप्रमाणे तुम्हाला पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले. आता तुम्ही रुग्णांना पंचतारांकित सेवा द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांशी बोलताना केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सोमवारी झाले.

जून २०२३ मध्ये केलेल्या पाहणीनंतर वसतिगृहाचे रूप पूर्ण बदलून उत्तम दर्जाच्या सोयींनीयुक्त असे वसतिगृह देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी ठाणे 
महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिले होते. त्यानुसार, निविदा प्रक्रिया पूर्ण करून, सुमारे ११ कोटी रुपये खर्च करून ९० दिवसात वसतिगृहाचे पूर्ण नवीन रूप साकारण्यात आले.

या सोहळ्यास पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेचे लोकार्पण
    वसतिगृहाचे उद्घाटन करण्यापूर्वी शिंदे यांनी मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेचे लोकार्पण केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील प्रसूती कक्षाला भेट देऊन या योजनेतील मातृत्व भेट मातांच्या हाती सुपूर्द केली. 
    त्या मातांशी त्यांनी संवाद साधला. या प्रसंगी, आयुक्त बांगर यांनी दोन्ही प्रकल्पांबाबत सादरीकरण केले. तसेच, विद्यार्थी प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. 

‘तुम्ही या यंत्रणेचा कणा’
शिंदे यांनी वसतिगृहाचे कॅन्टीन, व्यायामशाळा आणि खोल्यांची पाहणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले. रुग्णालयातील वातावरण, स्वच्छता, इमारत यांच्यामुळे रुग्ण अर्धा बरा होतो. उरलेला अर्धा भार हा डॉक्टरांवर असतो. तुम्ही या यंत्रणेचा कणा आहात, तुम्ही उत्तम काम करून अत्युच्च उपचार करावा, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

Web Title: Given five star hostel, now give five star patient care - Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.