भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांमुळे दिला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 01:32 AM2019-11-06T01:32:47+5:302019-11-06T01:33:44+5:30

पदाधिकाऱ्यांचा इन्कार : न्यायालयात खटला दाखल करण्याची देत होते धमकी

Given life because of allegations of corruption | भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांमुळे दिला जीव

भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांमुळे दिला जीव

Next

कल्याण : पश्चिमेतील प्रेम आॅटो परिसरातील विशाल राज सोसायटीचे २०११ ते १६ दरम्यान सोसायटीचा सेक्रेटरी असणाºया राजेंद्र सोनवणे (४८) यांच्यावर सोसायटीतील काही रहिवाशांनी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. न्यायालयात खटला दाखल करण्याची धमकीही काही रहिवाशांनी दिली होती. त्याच मानसिक तणावातून सोनावणे यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबाचे म्हणणे असून त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्येही तेच कारण नमूद केले आहे. मात्र सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर केले गेलेले हे आरोप बिनबुडाचे असल्याचे एका पदाधिकाºयाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

सोनावणे यांनी सेक्रेटरी पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुद्धा त्यांना त्रास सुरूच होता. त्याबाबत वारंवार स्पष्टीकरण देण्याबरोबरच आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करूनही काही रहिवाशी त्यांना मानसिक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे सोनवणे यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. आपल्या आजारी मित्राला सोमवारी रात्री भेटायला गेल्यानंतर त्याची विचारपूस करण्याबरोबरच आपल्याला मुलाबाळांसाठी जगायचे आहे, असे बोलणाºया सोनवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबीयांना तसेच आजूबाजूच्या रहिवाशांना धक्का बसला आहे. सोनावणे यांच्या सुसाईड नोटच्या आधारे महात्मा फुले चौक पोलीस पुढील तपास करीत आहेत.
ओम विशाल राज सोसायटीमधील बी विंगमध्ये दुसºया मजल्यावर सोनवणे आपली आई, पत्नी, दोन मुली आणि एका मुलासह १९९१ पासून राहत होते. कल्याण पूर्व आणि उल्हासनगर येथे सोनवणे यांचे चिकन शॉप आहे. मिळून मिसळून वागणाºया सोनवणे यांनी अचानक जीवन का संपवले, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. सोनवणे यांना त्रास देणाºयांवर कारवाईची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

कुटुंबीयांची माफी
आई, बहीण, भाऊ, पत्नी, मुले, पुतणे आणि भाचा यांच्यासमवेत स्वर्गात असल्यासारखे आनंदात राहत होतो. पण, सोसायटीमधील काहींनी कट कारस्थान करुन माझ्यावर आरोप करुन मला सोसायटीच्या सेक्रेटरी पदावरुन हटवले. रात्रंदिवस माझी निंदानालस्ती केली. माझा इतका छळ केला की, मला माझे जीवन संपवायला भाग पाडले. माझ्या आईचा मी खूप दोषी आहे. मला तिची सेवा करायची होती. पण, रात्ररात्र झोप येत नाही. सारखे तेच विचार माझ्या डोक्यात येतात. त्यामुळे जीव देण्याखेरीज माझ्यापुढे पर्याय उरलेला नाही, असे सोनावणे यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

Web Title: Given life because of allegations of corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.