सरकत्या जिन्याची जागा रेल्वेकडून चुकली, प्रवाशांना सोयीपेक्षा गैरसोयीचेच अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 03:47 AM2018-03-03T03:47:43+5:302018-03-03T03:47:43+5:30

एखादी योजना मंजूर झाल्यावर ती कशीबशी पूर्ण करण्याची घाई सध्या रेल्वे प्रशासनाची सुरू आहे. अंबरनाथ स्थानकात सरकत्या जिन्यांची नितांत गरज होती.

The gliding slope whose train was missed by the train, more inconvenient than the convenience of the passengers | सरकत्या जिन्याची जागा रेल्वेकडून चुकली, प्रवाशांना सोयीपेक्षा गैरसोयीचेच अधिक

सरकत्या जिन्याची जागा रेल्वेकडून चुकली, प्रवाशांना सोयीपेक्षा गैरसोयीचेच अधिक

Next

अंबरनाथ : एखादी योजना मंजूर झाल्यावर ती कशीबशी पूर्ण करण्याची घाई सध्या रेल्वे प्रशासनाची सुरू आहे. अंबरनाथ स्थानकात सरकत्या जिन्यांची नितांत गरज होती. मात्र, तो ज्या फलाटावर बसवणे गरजेचे होते, त्या ठिकाणी न बसवता थेट स्थानकाबाहेर बसवण्यात येत आहे. पश्चिम भागातून स्टेशनला येण्यासाठीच या जिन्याचा वापर होणार आहे. मात्र, या जिन्याचा चढ चुकीच्या ठिकाणी दिल्याने त्याचा वापर रेल्वे प्रवाशांना सोयीचा होणार नाही, हे मात्र निश्चित.
अंबरनाथ स्थानकात तीन फलाट आहेत. त्यातील एक आणि दोन हे फलाट एकाच ठिकाणी आहेत, तर तीन नंबरचा फलाट हा स्वतंत्र आहे. तीन नंबर फलाटावर केवळ मुंबईच्या दिशेने जाणाºया गाड्या येत असल्याने अंबरनाथ स्थानकात उतरणाºया प्रवाशांची संख्या अल्प आहे. त्यामुळे फलाटावर सरकत्या जिन्याची तशी जास्त गरज नाही. अंबरनाथ स्थानकात खरी गरज ही फलाट क्रमांक-१ आणि २ वरच आहे. या दोन्ही फलाटांचा जिना हा एकत्रित असल्याने त्या ठिकाणी सरकता जिना बसवणे गरजेचे आहे. कारण, याच फलाटांवर मुंबईहून कर्जत दिशेकडे जाणाºया लोकल येतात, तर फलाट क्रमांक-२ वर मुंबईहून अंबरनाथला आलेली गाडी थांबते. त्यामुळे या दोन्ही स्थानकांचा एकत्रित जिना हा सरकता असावा, अशी प्रवाशांची मागणी होती. अंबरनाथकरांची सरकत्या जिन्याची मागणी पूर्ण झालेली असली, तरी तो जिना ज्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे, ती जागा मात्र चुकली आहे.
अंबरनाथ पश्चिम भागातील तिकीट खिडकीच्या बाजूला हा जिना बसवण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, ज्या ठिकाणी हा जिना बसवण्यात येणार आहे, त्याचा वापर हा प्रवाशांना त्रासदायक आहे. तिकीट खिडकीकडे येण्यासाठी प्रवाशांना पादचारी पूल चढून पुन्हा खाली उतरावे लागते. त्यामुळे पश्चिम भागातील प्रवाशांना सरकत्या जिन्याचा वापर करायचा झाल्यास त्या प्रवाशांना आधी पादचारी पूल चढावा लागणार आहे. पुन्हा खाली उतरून हा सरकता जिना वापरावा लागणार आहे. त्यामुळे या सरकत्या जिन्याचा वापर करण्याऐवजी जिने चढणे हेच प्रवाशांसाठी सोयीचे झाले आहे.
ज्या ठिकाणी सरकता जिना बसवण्यात येत आहे, त्या तिकीट खिडकीपर्यंत येण्यासाठी प्रवाशांना चांगला रस्ता तयार करून दिलेला नाही. जिना चढून पुन्हा खाली उतरून तिकीट काढावे लागते. त्यामुळे या सरकत्या जिन्याचा वापर करावा कसा, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. या सरकत्या जिन्याचा वापर व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने आता पालिकेच्या पार्किंग झोनमधून रस्ता काढण्याची शक्कल काढली आहे. मात्र, ज्या ठिकाणी हा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्या ठिकाणी आधीच गाड्या उभ्या राहत असल्याने तो रस्ता अपुरा पडत आहे. तसेच उर्वरित रस्त्यावर रिक्षातळ असल्याने पादचाºयांना चालण्यासाठीही जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना सरकत्या जिन्यापर्यंत आणण्याचा मार्ग हा फसल्यात जमा झाला आहे.
>फलाट क्र.-१, २ साठी नवा पूल
यासंदर्भात रेल्वेच्या अधिकाºयांना विचारले असता फलाट क्रमांक-१ आणि २ वर जिने बसवण्यासाठी नव्या पुलाची गरज भासणार आहे. सध्याच्या पुलाला सरकता जिना जोडणे शक्य नसल्याने हा जिना तिकीट खिडकीजवळ बसवण्यात आल्याचे स्पष्ट केले.

Web Title: The gliding slope whose train was missed by the train, more inconvenient than the convenience of the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.