ग्लोबलमधील २५ पेक्षा अधिक रुग्णांचे पार्र्किंग प्लाझामध्ये स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 10:25 PM2021-04-25T22:25:13+5:302021-04-25T22:28:53+5:30
मर्यादित आॅक्सिजनच्या पुरवठयामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातील २५ पेक्षा अधिक रुग्ण हे पार्किंग प्लाझामध्ये हलविण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने रविवारी घेण्यात आला आहे. पार्र्किंग प्लाझामध्ये देखील आॅक्सिजन बेड सुरु झाले असल्याने ग्लोबलवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मर्यादित आॅक्सिजनच्या पुरवठयामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातील २५ पेक्षा अधिक रुग्ण हे पार्किंग प्लाझामध्ये हलविण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने रविवारी घेण्यात आला आहे. पार्र्किं ग प्लाझामध्ये देखील आॅक्सिजन बेड सुरु झाले असल्याने ग्लोबलवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून ज्या रुग्णांना कमी स्वरूपात आॅक्सिजन लागत आहे, अशाच रुग्णांना हलविण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
संपूर्ण ठाणे शहरातच आॅक्सिजनचा साठा हा मर्यादित स्वरूपात आहे. महापालिकेच्या रुग्णालयाबरोबरच खासगी रु ग्णालयांना देखील आॅक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने सर्वच
रु ग्णालये आपल्या परीने रु ग्णांना सेवा देण्याचे काम करीत आहेत. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या ग्लोबल हॉस्पिटल आणि पार्र्किं ग प्लाझा या दोन्ही
रु ग्णालयांमध्ये आॅक्सिजन बेड सुरु झाले आहे. असे असले तरी ग्लोबलवरील ताण अजूनही कायम आहे. मोठया संख्येने रु ग्ण याठिकाणी दाखल होत असल्याने आॅक्सिजनचा बेड मिळावा, यासाठी प्रत्येक रु ग्णांच्या नातेवाईकांची धडपड सुरु असते. ठाणे शहराला आॅक्सिजनचा पुरवठा सुरु असला तरी तो मर्यादित स्वरूपाचा असल्याने आता
ज्या रु ग्णांना कमी स्वरूपात आॅक्सिजनची गरज आहे, अशा रु ग्णांना पार्किंग प्लाझा या ठिकाणी उपचारासाठी स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . त्यामुळे रविवारी सकाळी २५ पेक्षा अधिक रु ग्णांना पार्र्किं ग प्लाझा या ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
नातेवाईकांमध्ये घबराट ...
ठाणे महापालिकेच्या ग्लोबलमधून रु ग्ण पार्किंग प्लाझा या ठिकाणी हलविण्यात आले असल्याने आॅक्सिजन पुरवठ्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या का ? असा संशय रु ग्णांच्या नातेवाईकांच्या मनात निर्माण झाला. अलिकडेच्या नाशिक येथील आॅक्सिजन गळतीच्या घटनेमुळे हे रुग्ण पार्र्किंग प्लाझामध्ये हलविण्यात येत नातेवाईकांमध्ये काही काळा घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
‘पार्र्किं ग प्लाझा या ठिकाणीही आता आॅक्सिजन बेड कार्यान्वित केले आहेत. त्यामुळे ग्लोबलवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांना कमी आॅक्सिजन लागते अशाच
रु ग्णांना पार्र्किं ग प्लाझामध्ये हलविण्यात येत आहे. ज्यांना जास्त आॅक्सिजनची गरज आहे, अशा
रु ग्णांना ग्लोबलमध्येच ठेवण्यात येणार आहे . आॅक्सिजनचे नियोजन योग्य पद्धतीने व्हावे आणि
रु ग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी हे नियोजन केले आहे.
संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका