स्पर्धक येत नसल्याने ग्लोबल टेंडरची प्रक्रिया अखेर गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:26 AM2021-06-23T04:26:06+5:302021-06-23T04:26:06+5:30

ठाणे : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेनेदेखील पाच लाख कोरोनाप्रतिबंधक लसींसाठी ग्लोबल टेंडरची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु ...

The global tender process was finally wrapped up as no contestants were coming | स्पर्धक येत नसल्याने ग्लोबल टेंडरची प्रक्रिया अखेर गुंडाळली

स्पर्धक येत नसल्याने ग्लोबल टेंडरची प्रक्रिया अखेर गुंडाळली

Next

ठाणे : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेनेदेखील पाच लाख कोरोनाप्रतिबंधक लसींसाठी ग्लोबल टेंडरची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु दोनवेळा मुदतवाढ देऊनही एकही स्पर्धक सहभागी न झाल्याने अखेर ठाणे महानगरपालिकेने ग्लोबल टेंडरची प्रक्रिया बासणात गुंडाळल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पाच लाख लसींसाठी ५० कोंटीचे ग्लोबल टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी ८ जूनपर्यंत निविदा भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. पालिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्वारस्य अभिव्यक्ती देकार मागविले आहे. २६ मेपासून ही निविदा बोली लावण्यासाठी खुली करण्यात आली होती. त्यानुसार यासाठी ८ जून ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मुंबई महापालिकेप्रमाणे ठाणेकरांना लस मिळावी, याउद्देशाने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेनेदेखील ग्लोबल टेंडर काढावे, असे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिकेने हे टेंडर काढले. त्यानुसार उत्पादन क्षमता आहे, त्यांनाच यात सहभागी होता येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्याअनुषंगाने कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक या लसींचे उत्पादक, त्यांचे भारतातील भागिदार, पुरवठादार, वितरक यांनाच हे देकार भरता येण्यासारखे होते. तसेच लसपुरवठ्याचा अनुभव असलेल्या कंपन्या आणि वितरकांनाच देकार भरता येणार होते, स्वारस्य देकार सादर झाल्यानंतर पालिकेची निविदा कमिटी तांत्रिक आघाड्यांवर त्यांची तपासणी करणार, सर्व अटी-शर्तीची पूर्तता करणाऱ्या निविदाकारांचे आर्थिक देकार उघडले जाऊन, त्यात कमी बोली लावणाऱ्या, तसेच कमीत कमी वेळेत लसपुरवठ्याची तयारी दाखविणाऱ्या उत्पादन किंवा वितरकांची निवड केली जाणार होती. परंतु आता पालिकेने काढलेल्या या निविदेला एकही स्पर्धक आला नाही. त्यामुळे पालिकेने पुन्हा याला दोनवेळा मुदतवाढ दिली होती. परंतु तरीदेखील एकही स्पर्धक न आल्याने अखेर ठाणे महापालिकेने ही निविदाप्रक्रियाच रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.

.............

ग्लोबल टेंडरला दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु त्याला एकही स्पर्धक आलेला नाही. त्यामुळे निविदाप्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त, ठामपा

Web Title: The global tender process was finally wrapped up as no contestants were coming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.