अंबरनाथमध्ये कार सेवकांचा गौरव
By पंकज पाटील | Published: January 17, 2024 06:20 PM2024-01-17T18:20:40+5:302024-01-17T18:20:59+5:30
22 जानेवारी रोजी अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीराम याचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा होणार आहे.
अंबरनाथ: अंबरनाथमध्ये कार सेवक गौरव समितीने कार सेवकांचा भव्य सत्कार केला. माजी नगराध्यक्षा पौर्णिमा कबरे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात करसेवकांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. मात्र यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने भर सभेत विवाहित ढाचा पाडताना शिवसेनेचे कोणीही नव्हते असं म्हणत व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांना कल्पना देण्याचा प्रयत्न केला.
22 जानेवारी रोजी अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीराम याचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा होणार आहे. त्यामुळे विवादित ढाचा पाडण्यासाठी गेलेल्या करसेवकानाचा अंबरनाथमध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, भाजप आमदार संजय केळकर, शिवसेना आमदार डॉ बालाजी किणीकर,भाजपच्या प्रदेश संयोजक डॉ शुभा फरांदे आणि विश्व हिंदू परिषदेचे महेंद्र उर्फ दादा वेदक हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी दादा वेदक यांनी विवादित ढाचा पडतानाचा घटनाक्रम सांगितले. मात्र घटना क्रम सांगत असताना त्यावेळी ढाचा पडताना शिवसेनेचे कोणीही नव्हते अस आमदार डॉ बालाजी किणीकर याना उद्देशून सांगितले.
त्यानंतर कार्यक्रमानंतर उपस्थित पत्रकारांना उत्तर देताना त्यांनी या प्रकरणाची सावरा सावराव करत ढाच्या पाडण्यासाठी कोणता पक्ष नव्हे तर तमाम हिंदू प्रेमी उपस्थित होते असे म्हणत आपल्याच विधानाला बगल दिली. एकीकडे शिवसैनिक विवादित ढाचा पडताना उपस्थित नव्हते यावरून अनेकदा वाद विवाद निर्माण झाले आहेत. यावेळी भाजपच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांसह, कारसेवक,शिवसेनेचे पदाधिकारी, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी , महिला पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.