तसा संकल्प करून देव यश देत नाही - नीलम गोऱ्हे
By अजित मांडके | Published: October 21, 2023 06:54 PM2023-10-21T18:54:32+5:302023-10-21T18:55:13+5:30
विजयादशमीच्या आझाद मैदानावरील सभेसाठी आमचे सगळे तयारी करत आहेत.
ठाणे: विजयादशमीच्या आझाद मैदानावरील सभेसाठी आमचे सगळे तयारी करत आहेत. एका बाजूला सातत्याने द्वेषाचे राजकारण होत आहे. कोणाला तरी विरोध करायचा समोरच्या माणसाला आयुष्यातून उठवायचे असा संकल्प केला जातो. पण असा संकल्प करून देव यश देत नसतो. असा टोला ही निलम गोऱ्हे यांनी लगावला. तर आझाद मैदाना वरील मेळावा हा लोकांना विकास होण्याच्या दुष्टीने स्फूर्ती देणारा कार्यक्रम असेल. असे मत विधान परिषदेच्या उपसभापती यांनी व्यक्त केले.
टेंभी नाका येथील देवीचे गोऱ्हे यांनी शनिवारी दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेता मीना कांबळी, आमदार मनीषा कायंदे माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव आदी उपस्थितीत होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी २२ विविध योजना जाहीर केल्या आहेत. या योजना नुसत्या जाहीरच नाही केल्या तर शिवदुतांच्या मार्फत त्याची अंमलाबजावणी करण्यासाठी सयंयोजन सुरु केले आहे. केवळ संकल्प करून न थांबता त्याची अंमलबजवानी करणारी यंत्रणा सरकारच्या बरोबरीने उभी करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचा निर्धार आहे. माझ्या मते जिथे महिलांना धोका वाटतो तिथे वेळ पडल्यास महिलांना शस्त्राचे परवाने दया अशी भूमिका मी विधीमंडळात मांडली असल्याच्या त्या म्हणाल्या.
संजय राऊत आरोप करतात की आमचा पक्ष ड्रग्जच्या बाजूने आहे का?. पण माझा त्यांना सवाल आहे की तुमच्याच पक्षातील तो ललित पाटील उबाठा तुन कधी बाहेर पडला. त्याच्यावर कधी कारवाई केली. तो तुमच्याच पक्षात आहे. त्याने कधी राजीनामा दिला तो अटकेत आहे. पण तुम्ही आम्हालाच उलटे प्रश्न करतात. असे खडे बोल त्यांनी सुनावले. नाना पटोले यांच्या बाबत त्यांना छेडले असता पटोले यांनी आधी हे स्पष्ट करावे की त्यांनी कोणाला ही विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा का दिला? त्याचा पुढील राजकारणावर काय परिणाम झाला हे सर्वानी पहिले आहे. तर महिला धोरणाबाबत एक महिन्यापूर्वी कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याबाबतची पूर्व तयारीची बैठक झाली होती. आता पुढच्या दोन महिण्यात धोरण मंजूर होईल अशी अपेक्षा असल्याचे त्या म्हणाल्या.