देव-धर्मही येणार सीसीटीव्हीच्या कक्षेत

By admin | Published: December 13, 2015 12:10 AM2015-12-13T00:10:49+5:302015-12-13T00:10:49+5:30

मिरा-भार्इंदरमधील धार्मिक स्थळे, बँक, एटीएम, वर्दळीची दुकाने, हॉटेल तसेच रोख रक्कम आणि सोने वाहून नेणाऱ्या वाहनांच्या सरक्षेसाठी विविध उपाय योजण्याच्या सूचना पोलिसांनी

God-religion can come in the CCTV chamber | देव-धर्मही येणार सीसीटीव्हीच्या कक्षेत

देव-धर्मही येणार सीसीटीव्हीच्या कक्षेत

Next

मीरा रोड : मिरा-भार्इंदरमधील धार्मिक स्थळे, बँक, एटीएम, वर्दळीची दुकाने, हॉटेल तसेच रोख रक्कम आणि सोने वाहून नेणाऱ्या वाहनांच्या सरक्षेसाठी विविध उपाय योजण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. धार्मिक स्थळांच्या ठिकाण़ी अनुचित घटना घडू नये म्हणून संबंधितांनी सीसीटीव्ही यंत्रणा, बर्गलर अलाम, वॉकी टॉकी, तारेचे कुंपण किंवा भिंत उभारायची आहे. आवश्यकतेनुसार शस्त्रधारी किंवा बिनशस्त्रधारी सुरक्षा रक्षक नेमायचे आहेत. त्यांची तसेच नोकर-व्यावसायिकांची चारित्र्य पडताळणी करून घ्यायची आहे. गर्दीवर नियंत्रणाचा, तसेच आपत्कालीन स्थितीसाठी कृती आराखडा तयार करायचा आहे.
ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक राजेश प्रधान यांनी या सूचना केल्या असून त्या अंमलात आणल्याचा अहवालही न चुकता पोलिस ठाण्यांनी सादर करण्यास सांगितले आहे. त्यानुसार मीरा भार्इंदरचे उपअधीक्षक सुहास बावचे यांनी शहरातील सहा पोलिस ठाण्याच्या प्रभारींना निर्देश दिले आहेत. शहरात काशीमिरा, मिरा रोड, नयानगर, नवघर, भार्इंदर व उत्तन सागरी अशी पोलिस ठाणी आहेत. तेथील प्रभारींनी आपापल्या हद्दीतील धार्मिक स्थळे , बँक, एटीएम, वर्दळीची दुकाने व हॉटेल आदी ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करायची आहे.

Web Title: God-religion can come in the CCTV chamber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.