उल्हासनगरात सभेसाठी गोलमैदान व दसरा मैदान!
By सदानंद नाईक | Published: March 14, 2024 07:24 PM2024-03-14T19:24:40+5:302024-03-14T19:26:13+5:30
मोठी सभा घेण्यासाठी गोलमैदान व दसरा मैदान असे दोनच प्रमुख मैदाने उपलब्ध असून याठिकाणी बहुतांश राजकीय सभा गाजणार आहे.
उल्हासनगर: शहरात मोठी सभा घेण्यासाठी गोलमैदान व दसरा मैदान असे दोनच प्रमुख मैदाने उपलब्ध असून याठिकाणी बहुतांश राजकीय सभा गाजणार आहे. याव्यतिरिक्त संच्युरी मैदान, कॅम्प नं-१ येथील जुना बस स्टॉप, सुभाष टेकडी येथील सिद्धार्थ स्नेह मैदान, कुर्ला कॅम्प चौक, नेताजी चौक, लालचक्की चौक, गुलशन टॉवर्स चौक, चोपडा कोर्ट येथील आंबेडकर चौक आदी ठिकाणी राजकीय सभा होणार आहेत.
उल्हासनगर हे उल्हासनगर, कल्याण पूर्व व अंबरनाथ अश्या ३ विधानसभा मतदारसंघात विभागले असून शहरात तब्बल ५ लाखा पेक्षा जास्त मतदारांची संख्या आहे. त्यामुळे बहुतांश राजकीय पक्षाचा डोळा शहरावर आहे. गोलमैदान व दसरा मैदान या प्रमुख मैदानात हमखास राजकीय सभा होतात. या दोन मैदाना व्यतिरिक्त कॅम्प नं-३ येथील डॉल्फिन संच्युरी मैदान, कॅम्प नं-१ येथील जुना बस स्टॉप जागा, कॅम्प नं-३ येथील गुलशन टॉवर्स चौक, कॅम्प नं-४ सुभाष टेकडी आंबेडकर चौक येथील सिद्धार्थ मैदान, कुर्ला कॅम्प, नेताजी चौक, कैलास कॉलनी शहर प्रवेशद्वार प्रांगण आदी ठिकाणी सभेचा धुराळा उडण्याची शक्यता आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी चौक सभा होण्याची शक्यता असून शहरातील मैदाने सभेसाठी आरक्षित करण्यासाठी प्रमुख पक्ष नेत्यांची धावपळ उडणार आहे.
शहरातील गोलमैदान व दसरा मैदान काही दिवसातच सभेसाठी आरक्षित करण्याची रणनीती सत्ताधारी पक्षाची असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या व्यतिरिक्त संच्युरी मैदान, सुभाष टेकडी येथील सिद्धार्थ मैदान, कुर्ला कॅम्प चौक, चोपडा कोर्ट आंबेडकर चौक आदी ठिकाण सभेचे आकर्षण असणार आहेत. शहरातील प्रांत कार्यालयात कल्याण लोकसभा उमेदवारीचे अर्ज भरण्यात येणार आहेत. त्यामुळे कल्याण लोकसभेत उल्हासनगर हे प्रमुख आकर्षणाचे केंद्र राहणार आहे.