साठाव्या वर्षी पॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:11 AM2018-05-29T01:11:53+5:302018-05-29T01:11:53+5:30

अंबरनाथ तालुक्यातील काराव येथील सुभाष शेलवले यांनी ‘आशियाई स्पर्धा २०१८’ मध्ये पॉवर लिफ्टिंग या खेळाच्या ८३ किलो वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त केले आहे.

Gold medal in power lifting in the sixty-year year | साठाव्या वर्षी पॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक

साठाव्या वर्षी पॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक

googlenewsNext

बदलापूर : अंबरनाथ तालुक्यातील काराव येथील सुभाष शेलवले यांनी ‘आशियाई स्पर्धा २०१८’ मध्ये पॉवर लिफ्टिंग या खेळाच्या ८३ किलो वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त केले आहे. एखाद्या क्षेत्रात सातत्याने प्रामाणिकपणे मेहनत केली तर यश मिळतेच, हे अंबरनाथ येथील आयुध निर्माणी कारखान्यातील कामगार सुभाष शेलवले यांनी दाखवून दिले आहे.
वयाच्या साठाव्या वर्षी पॉवर लिफ्टिंग या क्र ीडा प्रकारात आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याने सुभाष शेलवले हे चर्चेत आहेत. उदयपूर, राजस्थान येथे पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत ५० देशांत झालेल्या या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना सुभाष शेलवले यांनी सुवर्णपदक पटकावले. तिरंगा फडकावण्याचा बहुमान व सुवर्ण कामगिरी करणारे शेलवले हे अंबरनाथ तालुक्यातील काराव या गावातील रहिवासी आहेत. अंबरनाथ येथील आयुध निर्माणी येथे सेवेत आहेत.
तालुक्यातील काराव येथे राहणारे शेलवले यांचे वांगणी येथील महात्मा फुले विद्यामंदिर शाळेतून जुनी अकरावी मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर, शासनाच्या रोजगार विनिमय केंद्रातून आयुध निर्माणी कारखान्यात कामगार म्हणून ते रुजू झाले. नियमित व्यायाम करण्याची त्यांची सवय. त्यातूनच सुभाष शेलवले हे कबड्डी खेळू लागले. ते राष्ट्रीय पातळीवरील कबड्डी स्पर्धांमध्येही सहभागी झाले आहेत. यासोबतच पॉवर लिफ्टिंग क्र ीडा प्रकारातदेखील त्यांनी सराव कायम ठेवला होता. जिल्हा, विभागीय, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील पॉवर लिफ्टिंग स्पर्धांमध्ये त्यांनी पारितोषिके पटकावली. राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत ८३ किलो वयोगटात सुवर्णपदक पटकावून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. बेंच स्पेस, स्कॉट आणि डेड लिफ्ट या तिन्ही प्रकारांत मिळून त्यांनी स्पर्धेत एकूण ३६७ किलो वजन उचलले.

Web Title: Gold medal in power lifting in the sixty-year year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.