प्रसन्न गुडी मोडणार स्वत:चाच विक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 03:16 AM2017-12-28T03:16:18+5:302017-12-28T03:16:21+5:30

डोंबिवली : किराणा संगीत घराण्याचे बाळकडू घेतलेले भारतीय शास्त्रीय संगीत गायक प्रसन्न गुडी यांनी यापूर्वी एकदा २६ तास आणि त्यानंतर २९ तास ३० मिनिटे एकल गाण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

Good luck to break his good! | प्रसन्न गुडी मोडणार स्वत:चाच विक्रम!

प्रसन्न गुडी मोडणार स्वत:चाच विक्रम!

Next

- जान्हवी मोर्ये 
डोंबिवली : किराणा संगीत घराण्याचे बाळकडू घेतलेले भारतीय शास्त्रीय संगीत गायक प्रसन्न गुडी यांनी यापूर्वी एकदा २६ तास आणि त्यानंतर २९ तास ३० मिनिटे एकल गाण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. ‘गिनिज बुक’मध्ये त्याची नोंद झाली आहे. त्यानंतर, आता ते २०२० मध्ये स्वत:चाच हा विक्रम मोडून सलग ३१ तास गाण्याचा विक्रम करणार आहेत.
प्रसन्न मूळचे कर्नाटकातील धारवाड येथील रहिवासी. त्यांचे वडील माधव गुडी यांनी किराणा संगीत घराण्याचे गायक स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्याकडे २० वर्षे राहून गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतले. माधव गुडी यांच्यासोबत संगीत साथ देण्याचे काम प्रसन्न यांनी १२ व्या वर्षांपासून सुरू केले. तानपुरा वाजवणे, तबला शिकणे, याकडे त्यांचे मन होते. गायनाचा ताल व ठेका त्यांना त्यातून किशोरवयात कळला. वडिलांच्या सांगण्यानुसार फिरोज दस्तूर यांच्याकडे तीन वर्षे गायनाचे धडे घेतले.
२० वर्षांपासून प्रसन्न देशभर गायनाचे कार्यक्रम करत आहेत. शास्त्रीय संगीत गायनाबद्दल त्यांना वीर सावरकर, भारत हिंदू महासभा, सरकारजी ज्युनिअर फेलोशिप, दिगंबर पलूसकर संगीत पुरस्कार मिळालेले आहेत. दोनशेपेक्षा जास्त त्यांचे सत्कार झाले आहेत. २६ तास गायनाचा त्यांनी एक विक्रम केला. तो गिनिज बुकात नोंदला गेला. त्याचपाठोपाठ २०१६ मध्ये त्यांनी २९ तास ३० मिनिटे एकल गायनाचा विक्रम धारवाडच्या कलाभवनात केला. तोही गिनिज बुकात नोंदवला गेला आहे. प्रसन्न यांना विक्रम प्रस्थापित करून त्यांचाच विक्रम मोडीत काढायचा आहे. आता त्यांनी २०२० मध्ये ३१ तास एकल गायनाचे लक्ष्य ठेवले आहे.
कर्नाटकातील धारवाड ही संगीत, गायनाची भूमी आहे. तेथे सवाई गंधर्व, भीमसेन जोशी, गंगूबाई हनगल, फिरोज दस्तूर यासारख्या महान हस्ती होऊन गेल्या. प्रसन्न सध्या डोंबिवलीत वास्तव्याला आहेत. किराणा संगीत घराण्याचे गायक, अशी त्यांची उपाधी असली, तरी त्यांनी धारवाड संगीत घराणे तयार केल्याने त्यांची ओळख धारवाड संगीत घराणे, अशी करत आहेत. त्यासाठी त्यांनी एक धारवाड राग तयार केला आहे. डोंबिवलीत प्रसन्न यांनी गतवर्षी संगीत महायाग या संगीत गायन संस्थेची स्थापना केली आहे. संगीत महायागच्या माध्यमातून ते संगीतसेवा करत आहे. वयाच्या चाळिशीतच त्यांनी एकल गायनाचे विक्रम प्रस्थापित केले आहेत.
>रसिकांना उद्या मुंबईत पर्वणी
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शुक्रवारी, २९ डिसेंबरला प्रसन्न गुडी यांचा एकल संगीत गायनाचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात संतवाणी, कानडी, हिंदी व मराठी भजन गाणार आहे. या वेळी हार्मोनियमवर त्यांना निरंजन लेले, तबल्यावर सुशांत मल्ल्या, पखवाजवर राघवेंद्र मल्ल्या, तालवाद्य रवींद्र व तानपुºयावर नायडू साथसंगत करणार आहेत. निवेदनाची जबाबदारी संतोष जाधव सांभाळणार आहेत.

Web Title: Good luck to break his good!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.