गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी: पुढच्या वर्षी बाप्पा ११ दिवस लवकर येणार!

By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 8, 2024 03:15 PM2024-09-08T15:15:56+5:302024-09-08T15:16:17+5:30

गेल्या वर्षी १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी होती. त्यामुळे यावर्षी बाप्पा १२ दिवस लवकर आले. 

Good news for Ganesha devotees Bappa will arrive 11 days early next year | गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी: पुढच्या वर्षी बाप्पा ११ दिवस लवकर येणार!

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी: पुढच्या वर्षी बाप्पा ११ दिवस लवकर येणार!

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क |
ठाणे : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करीत दीड दिवसांच्या गणरायाला रविवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. पण पुढच्या वर्षी खरोखरच बाप्पा लवकर येणार आहेत. २०२५ साली बाप्पा ११ दिवस लवकर येणार आहेत. पुढील वर्षी श्रीगणेश चतुर्थी बुधवार २७ ऑगस्ट २०२५ रोजी येणार असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी सांगितले. 

वाजत गाजत शनिवारी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. संपूर्ण शहरातील वातावरण भक्तीमय झाले आहे. यावर्षी गौरी-गणपतीचे विसर्जन सहाव्या दिवशी होत आहे. यावषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, पुढच्या वर्षी गौरी-गणपतीचे विसर्जन सातव्या दिवशी होणार आहे. मंगळवार २ सप्टेंबर २०२५ रोजी गौरी-गणपतीचे विसर्जन होणार आहे. तसेच अनंत चतुर्दशी अकराव्या दिवशी शनिवार ६ सप्टेंबर २०२५ रोजी येणार आहे. गेल्या वर्षी १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी होती. त्यामुळे यावर्षी बाप्पा १२ दिवस लवकर आले. 

सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील एकरा वर्षातील श्रीगणेश चतुर्थीचे दिवस
१) बुधवार २७ ऑगस्ट २०२५
२) सोमवार १४ सप्टेंबर २०२६
३) शनिवार ४ सप्टेंबर २०२७
४) बुधवार २३ ऑगस्ट २०२८
५) मंगळवार 11 सप्टेंबर 2029
६) रविवार १ सप्टेंबर २०३०
७) शनिवार २० सप्टेंबर २०३१
८) बुधवार ८ सप्टेंबर २०३२
९) रविवार २८ ऑगस्ट २०३३
१०) शनिवार १६ सप्टेंबर २०३४
११) बुधवार ५ सप्टेंबर २०३५

Web Title: Good news for Ganesha devotees Bappa will arrive 11 days early next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.