गणेशभक्तांना खूशखबर! गणेशोत्सवासाठी ठाणे एसटी विभागाकडून ८०० बसेस कोकणात जाणार; या तारखेपासून बुकींग सुरू होणार  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 05:28 PM2021-07-15T17:28:41+5:302021-07-15T17:30:34+5:30

Ganeshotsav 2021: सध्या कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने एसटीने देखील आता कोकणात जाणा:या गणोशभक्तांसाठी एसटीच्या ठाणे विभागाकडून तब्बल ८०० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

Good news to Ganesha devotees! 800 buses from Thane ST department will go to Konkan for Ganeshotsav; Booking will start from this date | गणेशभक्तांना खूशखबर! गणेशोत्सवासाठी ठाणे एसटी विभागाकडून ८०० बसेस कोकणात जाणार; या तारखेपासून बुकींग सुरू होणार  

गणेशभक्तांना खूशखबर! गणेशोत्सवासाठी ठाणे एसटी विभागाकडून ८०० बसेस कोकणात जाणार; या तारखेपासून बुकींग सुरू होणार  

Next

ठाणे - मागील वर्षी कोरोनामुळे गौरी गणपती उत्सवासाठी चारकमाण्यांना कोकाणात जाण्यास मिळाले नव्हते. परंतु यंदा मात्र गणोशोत्सवासाठी कोकणात जाणा:या भक्तांसाठी ठाणेएसटी विभागामार्फत तब्बल ८०० बसेसचे नियोजन करण्यात आल्याची माहिती ठाणे एसटी विभागाकडून देण्यात आली आहे. (Ganeshotsav 2021) त्यानुसार या जादा वाहतुकीचा ६ ते १० सप्टेंबर २०२१ असा असून परतीच्या वाहतुकीचा कालावधी हा १४ ते १६ सप्टेंबर असा असणार आहे. त्यानुसार ज्या भक्तांना गावी जायचे असेल त्यांनी १५ जुलै पासून आपले आरक्षण बुक करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. (Good news to Ganesha devotees! 800 buses from Thane ST department will go to Konkan for Ganeshotsav; Booking will start from this date)

कोरोनामुळे एसटीच्या वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आजही एसटीला प्रंचड नुकसानीचा सामना करावा लागला आहे. आजही एसटी विभागाची ५१ टक्केच वाहतुक सुरु आहे. त्यातही संपूर्ण क्षमेतने एसटी बसेस बाहेर पडतांना दिसत नाहीत. परंतु सध्या कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने एसटीने देखील आता कोकणात जाणा:या गणोशभक्तांसाठी एसटीच्या ठाणे विभागाकडून तब्बल ८०० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यानुसार ठाणे एसटी विभागाकडून कोकणात जाणाल्या गणेश भक्तांसाठी दरवर्षीप्रमाणो आगाऊ संगणकीय आरक्षणाची सोय देखील करण्यात आलेली आहे. संगणकीय आरक्षणाचा कालावधी हा ६० दिवस आधी एकूण ८०० गाडयांचे नियोजन या विभागाकडून करण्यात आलेले आहे. त्यानुसार चिपळूण, रत्नागिरी, गुहागर, साखरपा, देवगड, कणकवली, सावंतवाडी, सिंधुदुर्ग अशा मार्गावर रा.प.ठाणे विभागातील बोरीवली, भाईंदर, ठाणे , मुलुंड, भांडुप, कल्याण, डोंबिवली, विठठलवाडी या बसस्थानकावरून बसेस सोडण्यात येणार आहेत. तरी उपनगरातील कोकणवासी गणोश भक्त व कोकण गणोश मंडळे यांनी ठाणे  विभागातील आगाराशी संपर्क साधण्यात यावा व सुरक्षित प्रवासाकरिता एस.टी बसनेच प्रवास करण्याबाबत ठाणो एसटी विभागाने आवाहन केले आहे. त्यानुसार गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या  भक्तांसाठी एसटी विभागातील बस स्थानकावरी आरक्षण खिडक्या २४ तास सुरु राहणार आहे. त्यानुसार ६० दिवस आधी जाण्याचे बुकींग करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यानुसार कोकणात जाण्यासाठी आरक्षण बुकींग हे १५ जुलै ते १९ जुलै २०२१ या कालावधीत सुरु होणार आहे. यावर्षीच्या गौरी-गणपती जादा वाहतुकीसाठी ६ सप्टेंबर ते १० सप्टेंबर र्पयत ८०० गाडय़ा सोडल्या जाणार आहेत.

Read in English

Web Title: Good news to Ganesha devotees! 800 buses from Thane ST department will go to Konkan for Ganeshotsav; Booking will start from this date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.