ठाणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रामध्ये उत्तम पाऊस; पाणी साठ्यात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 07:04 PM2020-08-16T19:04:27+5:302020-08-16T19:06:37+5:30

गेल्या काही दिवसांपासून धरणांमध्ये मात्र पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होत आहे. यामुळे पाणी कपातीची चिंता आता काही अंशी कमी झाल्याचे  समोर आले आहे.

Good rainfall in the dam area of Thane district; Increase in water reserves | ठाणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रामध्ये उत्तम पाऊस; पाणी साठ्यात वाढ

ठाणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रामध्ये उत्तम पाऊस; पाणी साठ्यात वाढ

googlenewsNext

ठाणे - चार दिवसांपासून संतत धार पडणाऱ्या पावसाची आजही जिल्ह्यातील सातही तालुक्यात रिपरिप सुरुच आहे.पण यंदा गेल्या काही दिवसांपासून धरणांमध्ये मात्र पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होत आहे. यामुळे पाणी कपातीची चिंता आता काही अंशी कमी झाल्याचे  समोर आले आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी ठाणे, मुंबईला पाणी पुरवठा करणारे बारवी धरण, आंध्रा, मोडक सागर १०० टक्के भरले होते, तर भातसा, तानसा आणि मध्यवैतरणा भरण्याच्या उंबरठ्यावर होते.

गेल्या वर्षी धरणातील पाणी साठा झपाट्याने वाढल्यामुळे सर्व धरणे आँगस्ट संपण्या आधी भरले होते. मात्र यंदा पाऊस लांबणीवर पडल्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र त्या दिवसापासून पाऊस लागून असल्यामुळे धरणांच्या पाणी साठ्यातही वाढ झाली आहे. यामुळे पाणी समस्येची चिंता आता काही अंशी कमी झाली आहे. निवासी भागात पडणार्‍या पावसाच्या तुलनेत आज धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर दिसून येत आहे.

बारवी धरणासह भातसा, आंध्रा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा धरणांच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीच्या बारवी धरणात २४ तासात आज सरासरी ७१.५० मिमी पाऊस पडला आहे. यापैकी बारवी धरणात ३२ मिमी., खानिवरे ११६, कान्होळ ३७, पाटगांव ८३ आणि ठाकूरवाडी ५० मिमी. सर्व साधारण पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. आता या धरणाची पाणी पातळी ६८.९६ मीटर झाली आहे. या धरणात अजून ३.६४ मीटर पाणी साठा होणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी या धरणात आज ७१.२२ टक्के पाणी साठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी तो १००.११ टक्के होता
बारवी धरणात ७२.६० मीटर म्हणजे ३४०.४८ दशलक्ष घनमीटर पाणी धरणात साठा यंदा करण्यात येणार आहे. त्यासाठी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून साडे तीन मीटर पाणी पाणी होणे आवश्यक आहे. त्यानंतर या पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. बारवी प्रमाणेच भातसा धरणात ८०.८९ टक्के पाणी साठा झाला आहे. आज धरणात ३८ मिमी पाऊस पडला आहे. तर आंध्र धरणात यंदा प्रथमच आज ८१ मिमी पाऊस पडला. आता या धरणात ५२.५७ टक्के पाणी साठा झाला आहे. मोडक सागरमध्ये ५१ मिमी पाऊस पडला आता या धरणात ९०.६३ टक्के साठा आहे. तानसात 21 मिमी पाऊस पडला असून आता धरणात ७९ टक्के पाणी साठा तयार झाला. तर मध्ये वैतरण आज ५० मिमी पाऊस पडला असता धरणात आता ८२ टक्के पाणी साठा संकलीत झाला आहे.

जिल्ह्यात या पावसाच्या रिपरिप मुळे आज सरासरी २३ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेतली आहे. यापैकी १७ मिमी., कल्याणला ३१, मुरबाडला २०, भिवंडीला १३, शहापूरला ४६, उल्हासनगरला २९ आणि अंबरनाथला १२मिमी पाऊस आज पडला आहे .

Web Title: Good rainfall in the dam area of Thane district; Increase in water reserves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.