प्रभाग क्रमांक ३८ मध्ये रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:25 AM2021-07-05T04:25:12+5:302021-07-05T04:25:12+5:30
अंबरनाथ : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक ३८ मधील माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांच्या पुढाकाराने ...
अंबरनाथ : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक ३८ मधील माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
अंबरनाथमध्ये माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांच्या वतीने नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात. याचाच एक भाग रविवारी अंबरनाथ पूर्व भागातील सिटी हॉस्पिटल परिसरात प्रभाग क्रमांक ३८ मध्ये नागरिकांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात ४७ रक्तदात्यांनी रक्तदान करत हे शिबिर यशस्वी केले. सकाळपासूनच नियोजनबद्ध पद्धतीने हे शिबिर घेण्यात आले. परिसरातील नागरिकांचा या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा यावेळी पाटील यांच्यावतीने कोरोनायोद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. यात डॉ. प्रकाश कौराणी, डॉ. रूपाली हिरे, डॉ. मनोज सिंग, डॉ. अनिश सिंग, डॉ. मेधावती चौधरी, पालिका कर्मचारी पांडुरंग गिलबिले, दत्तात्रय सोनजे आणि किरण सिनकर यांचा समावेश होता. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी भगवान धसाडे, कमलेश चंद्रमोरे, मनेश उंबरे, दीपक सकपाळ, जया गाजरे, अर्चना पितळे, संजय पवार, अपूर्वा पाटील, अमित वेदपाठक, हेमंत सावंत, समिर तावडे, सुमन जगताप आणि अलका वाकचौरे या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
यावेळी महिला शहर अध्यक्ष पूनम शेलार, युवक शहर अध्यक्ष प्रमोद बोराडे, शहर सरचिटणीस धनंजय सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र सोनकांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष विनोद शेलार आदी उपस्थित होते.
------------------------------------