भर पावसातही जनआशीर्वाद यात्रेला चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:44 AM2021-08-19T04:44:27+5:302021-08-19T04:44:27+5:30

शहरात सायंकाळी पाच वाजता कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. सर्वप्रथम हुतात्मा स्मारकाला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ...

Good response to Jana Aashirwad Yatra even in heavy rains | भर पावसातही जनआशीर्वाद यात्रेला चांगला प्रतिसाद

भर पावसातही जनआशीर्वाद यात्रेला चांगला प्रतिसाद

Next

शहरात सायंकाळी पाच वाजता कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. सर्वप्रथम हुतात्मा स्मारकाला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. भर पावसात ढोल-ताशांच्या गजरात पाटील यांचे स्वागत करण्यात आले. या जनआशीर्वाद यात्रेला पक्षीय राजकारणाशी जोडू नये, असे आवाहन पाटील यांनी केले. ही केवळ जनआशीर्वाद यात्रा असून, सर्वांच्या आशीर्वादाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अंबरनाथमध्ये भाजपचे शहराध्यक्ष अभिजित करंजुले आणि राजेश कौठाळे यांनी स्वागत केले. तर बदलापुरात आमदार किसन कथोरे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पाटील यांचे जंगी स्वागत केले. बदलापुरातही या जनआशीर्वाद यात्रेला कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

--------फोटो

Web Title: Good response to Jana Aashirwad Yatra even in heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.