कोरोना काळातही मुद्रांक शुल्क सवलतीस कल्याणमध्ये चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:41 AM2021-04-01T04:41:51+5:302021-04-01T04:41:51+5:30

शेवटच्या दिवसापर्यंत शुल्क भरण्यासाठी दिसून आली गर्दी मुरलीधर भवार लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : नव्या घर खरेदीनंतर घरांच्या नोंदणीसाठी ...

Good response in Kalyan for stamp duty concessions even during Corona period | कोरोना काळातही मुद्रांक शुल्क सवलतीस कल्याणमध्ये चांगला प्रतिसाद

कोरोना काळातही मुद्रांक शुल्क सवलतीस कल्याणमध्ये चांगला प्रतिसाद

googlenewsNext

शेवटच्या दिवसापर्यंत शुल्क भरण्यासाठी दिसून आली गर्दी

मुरलीधर भवार

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : नव्या घर खरेदीनंतर घरांच्या नोंदणीसाठी कल्याणच्या सह दुय्यम निबंधक कार्यालयात बुधवारी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. कोरोना काळात राज्य सरकारने मुद्रांक शुल्कावर दिलेल्या सवलतीचा नागरिकांना चांगला लाभ उठविला आहे. मुद्रांक शुल्कावरील सवलतीस मुदतवाढ देण्याचा निर्णय अद्याप तरी घेण्यात आला नसला तरी तो घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे बांधकाम व्यवसायाला हजारो कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला. कोरोना रुग्णांची संख्या गतवर्षी कमी होत असताना अनलॉकमध्ये पुन्हा बांधकाम व्यवसाय सुरू झाला; मात्र घर खरेदीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने सुरुवातीला चार टक्के आणि त्यानंतर तीन टक्के अशी मुद्रांक शुल्क सवलत दिली. कोरोनाचे सावट असतानाही केवळ कल्याण चिकणघर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात १ एप्रिल २०२० ते ३० मार्च २०२१ दरम्यान ६ हजार ७०० घरांची नोंदणी झाली. त्यावर चांगला बक्कळ मुद्रांक शुल्क राज्य सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे. कल्याण डोंबिवलीत पाच सह दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. एकाच कार्यालयात वर्षभरात ६ हजार ७०० घरांचे मुद्रांक शुल्क भरले गेले आहे तर अन्य कार्यालयातील आकडेवारी पाहता. सरासरी किमान २ हजार ५०० घरांची नोंदणी होऊन त्यावरील मुद्रांक शुल्क भरला गेला असल्याची शक्यता सह दुय्यम निबंधक कार्यालयातून व्यक्त करण्यात आला. यामध्ये सगळीच नवी घरे नोंदणी केली गेली नसतील, त्यात १० ते १५ टक्के घरे ही फेरविक्रीची असण्याची शक्यता आहे.

मागच्या वर्षी २५ ते ३० टक्के मुद्रांक शुल्क कमी जमा झाला होता. राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात डिसेंबर २०२० अखेर मुद्रांक शुल्कामध्ये ४ टक्के सूट दिली होती. त्यानंतर जानेवारी ते मार्च २०२१ अखेर या तीन महिन्यात तीन टक्के सूट दिली. ज्यावेळी मुद्रांक शुल्कात सवलत दिली नव्हती. तेव्हा स्थानिक संस्था कर, मुद्रांक शुल्क आणि मेट्रोवरील कर असा एकूण सात टक्के मुद्रांक शुल्क भरावा लागत होता. आता तीन टक्के सूट दिल्याने केवळ चार टक्केच मुद्रांक शुल्क भरावा लागला, अशी माहिती सह दुय्यम निबंधक जी. बी. सातदिवे यांनी दिली आहे.

चौकट-१

मुद्रांक शुल्कावरील सवलत ही ३१ मार्चपर्यंत होती. या सवलतीस मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते; मात्र त्याचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत. मुद्रांक शुल्कावर सवलत असल्याने काही नागरिकांनी आधी मुद्रांक शुल्क भरले. त्यानंतर चार महिन्यात ते रजिस्टर करू शकतात.

चौकट-२

मुंबई उपनगरासह ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. मेट्रोचा एक टक्के कर मुद्रांक शुल्कात आकारला होता. मेट्रो सेवा सुरू झाली नाही तर कर कसला, असा सर्व स्तरांतून आवाज उठविण्यात आल्याने हा मेट्रोचा कर मुद्रांक शुल्कात सामाविष्ट केला गेला नाही. दरम्यान, कल्याण डोंबिवली एमसीएचआय संघटनेकडूनही घर खरेदीवर तीन टक्के मुद्रांक शुल्क सूट डिसेंबर अखेरपर्यंत दिली गेली होती. त्यामुळेही घर खरेदी अधिक होण्यास मदत झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

फोटो-कल्याण-गर्दी

-----------------

वाचली

Web Title: Good response in Kalyan for stamp duty concessions even during Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.