अंबरनाथ ग्रामीण भागात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:41 AM2021-04-16T04:41:07+5:302021-04-16T04:41:07+5:30
नेवाळी हे महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे बाजारपेठ आहे. या ठिकाणाहून कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, शिळफाटा आणि मलंगगड परिसरातील ...
नेवाळी हे महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे बाजारपेठ आहे. या ठिकाणाहून कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, शिळफाटा आणि मलंगगड परिसरातील गावे हा परिसर जोडला गेलेला आहे. त्यामुळे या भागात नेहमीच वाहनांची आणि नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. अनेकदा वाहनांच्या गर्दीमुळे या ठिकाणी वाहतूककोंडी झाल्याचेही पाहायला मिळते. मात्र आजपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे या परिसरातले रस्ते संपूर्णपणे ओस पडल्याचे पाहायला मिळाले. सकाळपासून अगदी तुरळक वाहतूक या परिसरातल्या महामार्गावरून सुरू होती. या परिसरात अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळता अन्य सगळी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तर रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणारे विक्रेतेही फक्त पार्सल सुविधा देत होते. त्यामुळे शहरी भागापेक्षाही काटेकोरपणे ग्रामीण भागात लॉकडाऊन पाळला गेल्याचे पाहायला मिळाले.
----------------------------------------------