#GoodBye2017: एक दिवसाच्या जल्लोषाचा विशेष परवाना बेकायदा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 02:56 AM2017-12-30T02:56:20+5:302017-12-30T02:56:23+5:30
ठाणे- ३१ डिसेंबरसारख्या एक दिवसाच्या जल्लोषासाठी अग्निसुरक्षेचा विशेष परवाना देण्याची कोणतीही तरतूद कायद्यात धक्कादायक माहिती अग्निशमन अधिका-यांनी दिली.
डोंबिवली- ३१ डिसेंबरसारख्या एक दिवसाच्या जल्लोषासाठी अग्निसुरक्षेचा विशेष परवाना देण्याची कोणतीही तरतूद कायद्यात धक्कादायक माहिती अग्निशमन अधिका-यांनी दिली. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात लहान-मोठी सुमारे ९०० हॉटेल आहेत. ३१ डिसेंबरसह विविध सण-उत्सवांसाठी गर्दी होते. पण यातील ब-याचशा पार्ट्यांची कल्पनाच आम्हाला नसल्याने त्यावर नियंत्रण ठेवणार कसे, असा प्रश्न अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी उपस्थित केला. एक्साईज विभागही अशा विशेष तरतुदीसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांच्या अधिकाºयांनी दिली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात ३१ डिसेंबरच्या निरोपासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी होणाºया पार्ट्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास तिला सामोरे कसे जायचे, हा मोठा पेच आहे. कल्याण-डोंबिवलीत मोकळ््या जागेत, हॉलमध्ये होणाºया समारंभांत जर आपत्कालीन परिस्थिती ओढवली, तर अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले. अग्नीशमन दलाच्या अधिकाºयांशी चर्चा केल्यावर त्यांनीही नेमक्या किती ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्ट्या होणार आहेत, याची माहिती नसल्याचे सांगितले. त्यासंदर्भात ३० डिसेंबरला संध्याकाळी माहिती मिळेल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले आहे. तशी माहिती मिळाली तरी संध्याकाळनंतर नेमक्या किती ठिकाणी पोचता येईल, याबद्दल ते साशंक आहेत.
>अंबरनाथ-बदलापुरात निम्मीच सुरक्षा
अंबरनाथ, बदलापूर परिसरात निम्म्याच हॉटेलांनी सुरक्षेचे नियम कसेबसे पाळल्याची माहिती असून उरलेल्या ठिकाणी या नियमांकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले.
नववर्षानिमित्त सर्व हॉटेल आणि धाबे फुल्ल होणार आहेत, याची कल्पना असतानाही अंबरनाथ पालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. शहरात ३० ते ३५ हॉटेलांनाच परवानगी देण्यात आली आहे. उरलेली सर्व हॉटेल बेकायदा सुरू राहतील.
मुंबईतील आगीनंतर अग्निशमन विभाग जागा झाला आहे. त्यांनी आता शहरातील हॉटेल, धाबे यांच्या सुरक्षेची चाचणी सुरू केली आहे. बदलापूर आणि परिसरात अग्नीशमन विभागाच्या ना हरकत दाखल्यांच्या जीवावर अवघ्या ३५ हॉटेलमध्ये सुरक्षेचे उपाय योजल्याची शक्यता आहे. निम्म्या हॉटेलांनीच सुरक्षेकडे लक्ष पुरवले आहे. उरलेल्यांनी सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना आखलेल्या नाहीत. त्यामुळे या दोन्ही शहरांतील नागरिकांची सुरक्षा रामभरोसे आहे.