ठाण्यातील वकिलाला ठार मारण्याची धमकी देणाऱ्यास गुंडाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 12:00 AM2021-06-05T00:00:03+5:302021-06-05T00:04:03+5:30

कळवा येथील वकिल विक्रांत निंबाळकर यांच्या कार्यालयात कोयता घेऊन दोन साथीदारांसह शिरकाव करुन त्यांना धमकी देणाºया संजय गाडेकर (३१) या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी अटक केली आहे. त्याच्या अटकेमुळे तीन गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Goon arrested for threatening to kill Thane lawyer | ठाण्यातील वकिलाला ठार मारण्याची धमकी देणाऱ्यास गुंडाला अटक

ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई

Next
ठळक मुद्दे ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाईठाण्यासह नवी मुंबईतही गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कळवा येथील वकिल विक्रांत निंबाळकर यांच्या कार्यालयात कोयता घेऊन दोन साथीदारांसह शिरकाव करुन त्यांना धमकी देणाºया संजय गाडेकर (३१) या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी अटक केली आहे. त्याच्या अन्यही दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अ‍ॅड. निंबाळकर हे २९ मे २०२१ रोजी त्यांच्या विटावा येथील कार्यालयात बसले होते. त्याचवेळी गाडेकर हा त्याच्या दोन साथीदारांसह कोयता घेऊन त्यांच्या कार्यालयात शिरला. त्याने अ‍ॅड. निंबाळकर यांना कोयत्याचा धाक दाखवून ‘पांग्या भगत याची गाडी जाळल्याचे फूटेज तूच पोलिसांना दिले ना?’ अशी विचारणा करीत त्यांना ‘तू पांग्या भगतची केस लढायची नाहीस, नाहीतर तुला मारुन टाकेन,’ अशी धमकी दिली. त्यावेळी त्याने त्याच परिसरात राहणारे परेश भोईर यांनाही कोयता दाखवून ‘पांग्या कोठे आहे, सांग नाहीतर तुला बघून घेईल,’ असे धमकावत त्यांना मारहाण केली. नंतर कोयता हवेत फिरवून विटावा परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेजही ठाणे शहरात व्हायरल झाले होते. याप्रकरणी अ‍ॅड. निंबाळकर यांनी कळवा पोलीस ठाण्यात शिवीगाळ करणे, मारहाण करणे आणि ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती.
* गाडेकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. त्याच्याकडून अ‍ॅड. निंबाळकर यांच्या जीवाला धोका पोहण्याची शक्यता निर्माण झाल्याने या गुन्हयाची गांभीर्यता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी आरोपींच्या अटकेचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून कळवा गोपाळरावनगर, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ३ जून रोजी सायंकाळी ताब्यात घेतले.
* गाडेकर याने या सर्व प्रकाराची कबूली दिली आहे. त्याने पांग्या भगत याची स्कॉर्पिओ गाडी जाळल्याचे तसेच रबाले एमआयडीसी परिसरात संतोष अंगरख याला २९ मे रोजी जबर मारहाण करुन गंभीर जखमी केल्याचीही कबूली दिली. या दोन्ही प्रकरणांची अनुक्रमे कळवा आणि नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या अटकेमुळे तीन गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Goon arrested for threatening to kill Thane lawyer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.