सरकार सणांच्या नव्हे, तर कोरोनाच्या विरोधात; आंदोलन करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी लगावले टोले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 08:27 AM2021-09-01T08:27:12+5:302021-09-01T08:36:49+5:30
ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठानने उभारलेल्या ऑक्सिजन प्लान्टचे लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
ठाणे : हिंदुत्व विरोधी किंवा हिंदूच्या सणांच्या विरोधी सरकार अशी टीका करणाऱ्यांना मी सांगेन की केंद्राने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवून दहीहंडी व गणेशोत्सवात सतर्कता बाळगा, असे पत्र राज्याला दिले आहे. त्यामुळे राज्य सरकार हिंदूच्या सणांविरोधी नाही. मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने करून जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्यांनी कोरोनाविरुद्ध आंदोलने करावीत, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी भाजप, मनसेला नाव न घेता लगावला.
ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठानने उभारलेल्या ऑक्सिजन प्लान्टचे लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खा. संजय राऊत, प्रतिष्ठानचे प्रमुख आ. प्रताप सरनाईक उपस्थित होते. सध्या दहीहंडीच्या उत्सवावरून व मंदिरे उघडी करण्यावरून आंदोलने सुरू आहेत; मात्र हे कोणतेही स्वातंत्र्ययुद्ध नसून ते मिळालेच
पाहिजे असे नाही.