उल्हासनगरातील शासकीय बालगृह अंधारात, मनसेच्या इशाऱ्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत
By सदानंद नाईक | Published: February 7, 2023 06:04 PM2023-02-07T18:04:02+5:302023-02-07T18:04:47+5:30
उल्हासनगरातील कॅम्प नं-५ परिसरात शासनाच्या महिला व बालकल्याण व समाजकल्याण विभागाचे शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृह, शासकीय मुलांचे कनिष्ठ व वरिष्ठ बालगृह, शासकीय मुलांचे अपंग बालगृह व शासकीय मुलींचे निरीक्षणगृह आहे.
उल्हासनगर : शहरातील शासकीय मुलांचे वरिष्ठ बालगृह, शासकीय मुलांचे कनिष्ठ व वरिष्ठ बालगृह, शासकीय मुलाचे अपंग बालगृह व मुलींचे निरक्षणगृहाचे वीज बिल थकल्याने, महावितरणने वीज पुरवठा खंडित केला. गेले एक आठवडा अंधारात असलेल्या बालगृहाचा वीज पुरवठा मनसेच्या आंदोलनामुळे पूर्ववत केला. उल्हासनगरातील कॅम्प नं-५ परिसरात शासनाच्या महिला व बालकल्याण व समाजकल्याण विभागाचे शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृह, शासकीय मुलांचे कनिष्ठ व वरिष्ठ बालगृह, शासकीय मुलांचे अपंग बालगृह व शासकीय मुलींचे निरीक्षणगृह आहे.
यामध्ये आई-वडील नसलेले, इतरत्र सापडलेल्या मुलांना ठेवले जाते. बालगृहाचा मोफत सुखसुविधा मुलांना मिळत असून जिल्ह्यात सर्वाधिक ४ बालगृह, मुलीचे निरीक्षणगृह व महिलांचे निरीक्षणगृह आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेकडो मुलांना नरक यातना सोसाव्या लागत आहेत. बालगृह व मुलींचे निरीक्षणगृह यांचे वीज बिलाची थकबाकी वाढल्याने, गेल्या सहा महिन्यांपूर्वी महावितरण विभागाने त्यांचा वीज पुरवठा खंडित केल्याने, मुलांना व मुलींना गेले १५ दिवस अंधारात राहावे लागले होते. पुन्हा हाच प्रकार घडला असून एकून ३ बालगृहे व मुलीचे निरक्षणगृहाचा वीज पुरवठा खंडित केल्याने, गेले ८ दिवस मुले व मुली अंधारात राहिल्याचे उघड झाले.
मनसे विद्यार्थी सेनेचे मनोज शेलार यांच्यासह अन्य जणांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यावर बालगृह व मुलीचे निरीक्षण गृहाचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्षरीत्या भेटून बालगृहाची समस्या असून निधी देण्याची मागणी केली. शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृहाचे अधिक्षक विनोद वळवी यांनी शहरातील तीन बालगृह व मुलींचे निरीक्षणगृह यांची विजबिल थकबाकी वाढली होती. शासनाचा निधी आल्यानंतर वीज बिलाचा भरणा करतो, अशी विनंती महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना करूनही वीज पुरवठा खंडित केल्याचे सांगितले. यामुळे बालगृहतील मुले व निरीक्षण गृहातील मुली अंधारात राहिल्याची माहिती दिली. याप्रकारने शहरातून शासन कारभारावर टीका होत आहे.