मनसुख हिरेन यांची हत्या सरकारला वाचविता आली असती- किरीट सोमय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 09:29 PM2021-03-08T21:29:09+5:302021-03-08T21:30:35+5:30
राज्य सरकारच्या उद्धट आणि उर्मटपणामुळे मनसुख हिरेन यांचा जीव गेला असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी केला. सोमय्या यांनी हिरेन कुटूंबियांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी हा आरोप केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: राज्य सरकारच्या उद्धट आणि उर्मटपणामुळे मनसुख हिरेन यांचा जीव गेला असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी केला. सोमय्या यांनी हिरेन कुटूंबियांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी हा आरोप केला.
मनसुख यांची पत्नी आणि तिन्ही मुले दु:खात आहेत. त्याचबरोबर त्यांच्यात संतापही खदखदत आहे. पोलीस,गृहमंत्री आणि ठाकरे सरकारने राजकारण करण्याचा घाणेरडापणा केला आहे, ही खेदाची बाब आहे. सरकारच्या उद्धट आणि उर्मटपणामुळे मनसुख यांचा बळी गेला. कोणतेही कारण नसतांना आपल्या पतीचा यात बळी गेल्याचे मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याचे ते म्हणाले. ठाकरे सरकार हे माफियांचे सरकार असून शिवसेना हे पोलिसांचा उपयोग गुंड म्हणून करीत आहे. त्यामुळेच निर्दोष माणसांची हत्या होत आहे. मनसुख यांची हत्या ठाकरे सरकारला वाचविता आली असती, मात्र मृत्युपूर्वी त्यांनी दिलेल्या पत्राकडेही दुर्लक्ष झाल्याने त्यांचा गूढ मृत्यु झाल्याचे ते म्हणाले.
* कोविड सेंटरबाबत अनेक तक्रारी-
कोविड लसीकरणाबाबत महापालिका प्रशासन जेष्ठ नागरिकांना सेवा देत नाही. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
महापालिका आणि ठाकरे सरकारने याबाबत जेष्ठ नागरिकांसाठी योग्य ती व्यवस्था केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. ठाणे आणि मुंबई परिसरातील २५ कोविड सेंटरला भेटी देणार असून मुंबईत २४ तास लसीकरणाची सुविधा सुरु करण्यात यावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली केली.