शासनाचे प्रथम पारिताेषिक मुरबाड ग्रामीण रुग्णालयाला; जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मान

By सुरेश लोखंडे | Published: May 1, 2023 04:50 PM2023-05-01T16:50:51+5:302023-05-01T16:51:06+5:30

पुरस्कारात पन्नास हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र आदी रूग्णालयास प्राप्त झाले आहे.

Government first prize to Murbad Rural Hospital; Honored by the District Collector | शासनाचे प्रथम पारिताेषिक मुरबाड ग्रामीण रुग्णालयाला; जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मान

शासनाचे प्रथम पारिताेषिक मुरबाड ग्रामीण रुग्णालयाला; जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मान

googlenewsNext

ठाणे : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ‘सुंदर माझा दवाखाना’ या मोहिमेची घाेषणा केली आहे. या माेहिमेच्या अंमलबजावणीस अनुसरून एप्रिलमध्ये केलेल्या परीक्षणात ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयाला जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. यामुळे महाराष्ट्र दिनाचे औचित्या साधून ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांनी या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रसाद भंडारी आणि त्यांचे सहकारी अधिकारी आणि कर्मचारी यांचे जिल्हास्तरावर आज अभिनंदन केले.

पुरस्कारात पन्नास हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र आदी रूग्णालयास प्राप्त झाले आहे. गेल्या वर्षभरात या ग्रामीण रुग्णालयत आमुलाग्र बदल आणि आंतरबाह्य कायाकल्प करण्यात आला. यामुळे रुग्णालयाची प्रतिमा जनमानसात उंचावली आहे. रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रिया, हायड्रोसिल हर्निया आणि इतर किरकोळ शस्त्रक्रिया, अस्थिव्यंगाचे उपचार, फ्रॅक्चर रुग्णांचे उपचार नियमितपणे होत आहेत. याशिवाय रुग्णालयामध्ये अध्ययावत शस्त्रक्रिया गृह आणि रक्त साठवण केंद्र सुरू आहे. त्यामुळे या रूगणालयाच्या भरीव कार्या र्ची दखल घेऊन राज्य शासनाने त्यास प्रथम पारिताेषीक देऊन सन्मान केला आहे. जिल्हाधिकार्यांप्रमाणेच आमदार किसन कथोरे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी रूग्णालया व्यवस्थापनाचे अभिनंदन केले आहे.

रुग्णालयाचा परिसर हा वृक्षारोपण बाग बगीचे बनवून अतिशय स्वच्छ, सुंदर आहे. गेल्या वर्षभरात रुग्णालयात ८७ सिजेरियन शस्त्रक्रिया दोनशेच्या वर इतर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ५५७ नॉर्मल प्रसूती रुग्णालयात पार पडल्या आहेत. त्यामुळे ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी देखील रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रसाद भंडारी काैतुक करीत अभिनंदन केले आहे.

Web Title: Government first prize to Murbad Rural Hospital; Honored by the District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे