ठाणे जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून बेमुदत संप
By सुरेश लोखंडे | Published: March 13, 2023 07:32 PM2023-03-13T19:32:25+5:302023-03-13T19:33:17+5:30
ठाणे जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
ठाणे : राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसह इतरही प्रलंबित मागण्यांसाठी १४ मार्चपासून जिल्ह्यातील सर्व कर्मचारी बेमुदत राज्यव्यापी संपात सहभागी होत आहेत, असा दावा येथील जिल्हा शाखेचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळे, यांच्यासह नोंदणी व मुद्रांक विभागचे प्रविण गीरी संतोष देवडे, जि.प. सेवा निवृत्तचे पदाधिकारी राजेंद्र जगे यांनी लोकमतला सांगितले.
या संपात सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती कर्मचारी व कंत्राटी मोठ्यासंख्येने सहभागी होत आहेत. यामध्ये सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे कमी करु नका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचान्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभा आदी मंजूर केल्याशिवाय हा राज्यस्तरीय बेमुदत संप मागे घेणार नसल्याचे या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
या संपाला महाराष्ट्र कामगार संघटना संयुक्त कृति समिती, अंगणवाडी कर्मचारी, सेविका, आशा वर्कर्स, आदींसह विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी जिल्हह्याचे नेतृत्वराज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या अध्यक्षा प्राची चाचड, चतुर्थश्रेणीचे प्रदिप मोरे, संतोष शिंदे, उदयराज शेळके आदी नेतृत्व करीत आहेत.