कुंभमेळ्यावरील सरकारी खर्च हा देशाला दिवाळखोरीत लोटणारा- भन्ते खेम धम्मो महास्थवीर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 06:11 PM2019-02-10T18:11:02+5:302019-02-10T18:11:25+5:30

सत्तेवर असलेल्या सरकारकडून एका विशिष्ट धर्माला नावाखाली कुंभमेळ्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे.

Government spending on Kumbha Mela is going to be bankrupt - Bhante Khem Dhammo Mahasavir | कुंभमेळ्यावरील सरकारी खर्च हा देशाला दिवाळखोरीत लोटणारा- भन्ते खेम धम्मो महास्थवीर

कुंभमेळ्यावरील सरकारी खर्च हा देशाला दिवाळखोरीत लोटणारा- भन्ते खेम धम्मो महास्थवीर

Next

कल्याण- सत्तेवर असलेल्या सरकारकडून एका विशिष्ट धर्माला नावाखाली कुंभमेळ्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. हिंदू धर्माल झुकते माप देऊन कोणत्या संविधानाप्रमाणे आपण धर्मनिरपेक्षता जपतो का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुंभमेळ्य़ावरील सरकारी खर्च हा देशाला दिवाळखोरीत लोटणारा आहे. तसेच कुंभमेळा हा देशाला अज्ञानाच्या दरीत लोटणारा आहे. त्याला सरकारचे पाठबळ मिळत असल्याची प्रखर टीका भन्ते खेम धम्मो महास्थवीर यांनी येथे केले.

समता सांस्कृतिक केंद्र कल्याण अंतर्गत इंटरनॅशनल बुद्धिस्ट पीस ऑगनायझेशनच्या वतीने फडके मैदानात आंतरराष्ट्रीय धम्म परिषद-2019 आयोजन आज रविवारी करण्यात आले होते. याप्रसंगी भन्ते खेमा धम्मो महास्थवीर उपरोक्त वक्तव्य केले. याप्रसंगी पंडित भदन्त ज्ञानेश्वर, ऑल इंडिया भिक्खू संघाचे अध्यक्ष सदानंद महास्थवीर, आमदार गणपत गायकवाड, नरेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या परिषदेच्या आयोजनासाठी भन्ते आग्गा धम्मा थेरो यांनी अथक परिश्रम घेतले. या प्रसंगी आमदार गायकवाड व पवार यांचासह प्रदीप जगताप व रिक्षाचालक रमेश लोखंडे यांचाही सत्कार करण्यात आला.

भन्ते खेम धम्मो यांनी सांगितले की, कुंभमेळाव्यात गेल्यावर मनुष्याचे मन प्रचंड उदास होते. कुंभमेळाव्यातील प्रदर्शन पाहिल्यावर मानव जात किती अज्ञान आणि भोळेपणाच्या आहारी गेली आहे. बाह्य शुद्धीच्या मागे लागली आहे. कर्मकांडाच्या आहारी गेली आहे. कोणत्याही पाण्यात कितीही डुबक्या मारल्या तरी मानवाचे मन निष्पाप होत नाही. तसेच मनुष्याच्या मनातील मानसिक द्वेष, क्रोध, मत्सर, अहंकार जात नाही. दाढी वाढवून, अंगाला भस्म लावून, एका पायावर उभे राहून तपश्चर्या केली तरी मनाची तपश्चर्या होऊ शकत नाही. खरी तपश्चर्येचा मार्ग विपश्यना आहे. ती घेतल्यावर मानव विकारमुक्त होण्यास मदत होते.

Web Title: Government spending on Kumbha Mela is going to be bankrupt - Bhante Khem Dhammo Mahasavir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.