शासनाची वृक्ष लागवड योजना वनविभागाने ठरवली फोल, लागवडीअभावी रोपवाटिकेतील रोपे पाण्याविना मृत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 01:22 PM2021-04-09T13:22:16+5:302021-04-09T13:22:42+5:30
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून खर्च करून रोपवाटिकेत तयार करण्यात आलेल्या रोपांची वनविभागाने लागवडच न केल्याने रोपवाटिकेत अखेरच्या घटका मोजत असलेली रोपे पाण्याविना जागीच सुकून गेली असल्याने वनविभागाच्या भोंगळ कारभाराबाबत सर्वत्र चर्चेला उधाण आले आले.
ठाणे - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत वृक्ष लागवडीसाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून खर्च करून रोपवाटिकेत तयार करण्यात आलेल्या रोपांची वनविभागाने लागवडच न केल्याने रोपवाटिकेत अखेरच्या घटका मोजत असलेली रोपे पाण्याविना जागीच सुकून गेली असल्याने वनविभागाच्या भोंगळ कारभाराबाबत सर्वत्र चर्चेला उधाण आले आले. (Government's tree planting scheme failed by Forest Department Fall, seedlings in nursery die due to lack of planting)
राज्य शासनाने सन 2016-17 ला 2 कोटी ,सन 2017-18 ला चार कोटी व सन 2018 - 19 ला 13 कोटी वृक्ष लागवडीचे धोरण अवलंबिले होते . यातील 13 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत रोपे लावण्यासाठी वनविभागाच्या शहापूर तालुक्यातील डोळखांब वन परिक्षेत्र अंतर्गत असणाऱ्या खराडे परिमंडळमध्ये येणाऱ्या वेहलोली रोपवाटिकेत वन विकास यंत्रणा योजनेतून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील 3 लाख रुपये उपलब्ध निधी खर्च करून प्रती हेक्टरी अकराशे रोपांची लागवड या प्रमाणे वीस हेक्टर क्षेत्रात लागवडीसाठी विविध जातीची 22 हजार रोपे तयार करण्यात आली होती. यातील किमान चार ते पाच हजार रोपांची वनविभागाने लागवडच न केल्याने रोपे रोपवाटिकेत जागीच पाण्याविना सुकून मृत पावली असल्याने निसर्गप्रेमी हळहळ व्यक्त करतात. यावर्षी रोपवाटिकेसाठी वनविभागाकडून निधीच उपलब्ध नसल्याने रोप वाटिका बंद करण्यात आल्या असल्याचे वनपाल पी.के. थोरे यांनी सांगितले.