राज्यपालांच्या हस्ते ठाणेच्या शहापूरला मुलींच्या वसतीगृहाचे उद्घाटन., मुलींसाठी अनुदानीत आश्रमशाळेचे वसतीगृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 07:35 PM2018-10-12T19:35:39+5:302018-10-12T19:41:28+5:30
राज्यपाल दौऱ्यावर येत असल्याची चर्चा मागील आठवड्यापासून सुरू आहे. आदिवासी विकास विभागाची अनुदानीत मुलींची आश्रमशाळा वाफे येथे आहे. तेथील सुमारे एक लाख १६ हजार ७१७ चौरस फूटाच्या प्रांगणात बांधलेल्या या वसतीगृहाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते
ठाणे : शहापूर तालुक्यातील वाफे येथील मुलींसाठी अनुदानीत आश्रमशाळेचे वसतीगृह बांधण्यात आले आहेत. या वसतीगृहाच्या उद्घाटनासाठी राज्यपाल सी विद्यासागर राव १३ आॅक्टोबर रोजी शहापूर दौऱ्यावर येत आहेत. हेलिकॉप्टरने त्यांचे आगमन सकाळी १०.२० वाजता होणार असून त्यासाठी गोठेघर येते हेलिपॅड तयार करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
राज्यपाल दौऱ्यावर येत असल्याची चर्चा मागील आठवड्यापासून सुरू आहे. आदिवासी विकास विभागाची अनुदानीत मुलींची आश्रमशाळा वाफे येथे आहे. तेथील सुमारे एक लाख १६ हजार ७१७ चौरस फूटाच्या प्रांगणात बांधलेल्या या वसतीगृहाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात येत आहे. आज दुपारी त्यांचा दौरा निश्चित झाल्याचे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी लोकमतला सांगितले. राजभवनहून राज्यपाल हेलिकॉप्टरने थेट शहापूरच्या गोठेघर येथील हेलिपॅडवर उतरणार आहे. त्यासाठी खास हेलिपॅड तयार करण्यात आले आहे.
राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन होत असलेल्या मुलींच्या या वसतीगृहाची वास्तु अधिकृतरित्या परवानगी घेऊन बांधण्यात आली की नाही यासह वास्तुच्या मालकीपासून ते जमीन कोणाची आहे., सातबारा कोणाच्या नावे आहे. या वास्तूची बांधकाम परवानगी घेतली की नाही. कोणाची परवानगी घेतली. या वास्तूच्या बांधकामाच्या प्लॅनला कोणत्या प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाली आदींचा अधिकृत शासकीय चौकशी अहवाल जिल्हा प्रशासनाने शहापूर तहसिलदारामार्फत शासनास सुपुर्द केला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी राज्यपाल येणार असल्याचे निश्चित झाले.