केडीएमसीच्या कचरागाड्यांवर ‘जीपीएस’

By admin | Published: June 20, 2017 06:18 AM2017-06-20T06:18:28+5:302017-06-20T06:18:28+5:30

केडीएमसीने २२५ कचरा गाड्यांवर जीपीएसप्रणाली बसवली आहे. त्यामुळे या गाड्या आॅनलाइन ट्रेकिंगवर आल्या आहेत. या प्रणालीमुळे कचरा वाहतुकीत केली जाणारी फसवणूक व खोटेपणा टाळता येणार आहे

'GPS' on KDC junkyard | केडीएमसीच्या कचरागाड्यांवर ‘जीपीएस’

केडीएमसीच्या कचरागाड्यांवर ‘जीपीएस’

Next

मुरलीधर भवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसीने २२५ कचरा गाड्यांवर जीपीएसप्रणाली बसवली आहे. त्यामुळे या गाड्या आॅनलाइन ट्रेकिंगवर आल्या आहेत. या प्रणालीमुळे कचरा वाहतुकीत केली जाणारी फसवणूक व खोटेपणा टाळता येणार आहे. त्यातील सत्यता पडताळणे महापालिकेच्या मुख्यालयातून एका क्लिकवर शक्य होणार आहे.
महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी ही माहिती दिली आहे. महापालिकेच्या प्रभागांमधील कचरा २२५ गाड्यांद्वारे गोळा करून आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. या गाड्यांवरआता जीपीएस प्रणाली बसवल्याने कोणती गाडी कोणत्या प्रभागात किती वाजता कचरा गोळा करण्यासाठी गेली, ती तेथे किती वेळ उभी होती, किती टन कचरा गोळा केला, या गाडीच्या किती फेऱ्या झाल्या, यावर महापालिका मुख्यालयात बसून देखरेख ठेवता येणार आहे. त्याचबरोबर गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीचाही लेखाजोखा यातून उघड होणार आहे. गाडी किती वेळा गॅरेजला गेली, त्यात किती वेळा इंधन भरले गेले. इंधन भरले तर गाडी खरोखरच किती किलोमीटर चालली, याचीही माहिती उपलब्ध होणार आहे. जीपीएस आॅनलाइन व्हेइकल ट्रेकिंग सिस्टीम बसवण्यासाठी महापालिकेने एक कोटी ४२ रुपये खर्च केले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या केपीएमजी कंपनीने ही प्रणाली बसवली आहे.
महापालिकेने स्मार्ट सिटीच्या प्रस्तावावर कामास सुरुवात केली आहे. कचरा गाड्यांवरील जीपीएस यंत्रणा स्मार्ट सिटीसाठी अत्यंत पूरक ठरणार आहे. त्यामुळे कचरा गाड्यांचे नियंत्रण स्मार्ट झाले असल्याचा दावा उपायुक्त तोरस्कर यांनी केले आहे.
पालिकेचे माजी सचिव सुभाष भुजबळ हे गाडीचा वापर करत नव्हते. तरीही ते महापालिकेचा वाहन भत्ता घेत होते, या आशयाची तक्रार माहिती अधिकराचे कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी केली होती. जीपीएस प्रणाली नसल्याने भुजबळ यांच्या गाडीवापराविषयी शहानिशा करणे महापालिकेस शक्य नव्हते. हे प्रकरण लक्षात घेऊन महापालिकेच्या अन्य वाहनांवरही जीपीएस यंत्रणा बसवली जाणार आहे.

Web Title: 'GPS' on KDC junkyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.