मालमत्ता हडपुन घरातील सामान फेकले रस्त्यावर; शिवसेना ठाकरे गटाच्या विभागप्रमुखासह १० जणांवर गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Published: June 23, 2023 05:37 PM2023-06-23T17:37:52+5:302023-06-23T17:38:09+5:30
उल्हासनगर शिवसेना ठाकरे गटाच्या विभागप्रमुखासह १० जणांवर गुन्हा दाखल
उल्हासनगर : महिला गावी गेल्याचा फायदा घेत शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुखासह अन्य जणांनी घरावर कब्जा करून सामान रस्त्यावर फेकल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात १० जणांवर गुन्हा दाखल झाला असून रेखा कुंचे या महिलेवर दोन मुलासह उघडयावर राहण्याची वेळ आली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५ नेहरूनगर येथे रेखा सुनिल कुंचे या महिला मुलासह राहतात. रेखा कुंचे ह्या गावी घेल्याचा फायदा शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख अनिल उर्फ लाल्या बाळू कुंचे यांच्यासह अनिता कुंचे, रोशनी कुंचे, दिनेश कुंचे, संदेश कुंचे, सरिता सावंत, गीता जाधव, आशा जाधव व रेखा गायकवाड आदींनी घेऊन ३० मे रोजी रेखा कुंचे यांच्या घरावर कब्जा केला. तसेच घरातील सामान रस्त्यावर फेकून देऊन घरात भाडेकरू ठेवला. घरातील कपाटात ठेवलेले रोख ८ लाख रुपये व इतर साहित्य असे एकून १० लाख ४० हजाराचा चोरीला गेल्याची तक्रार हिललाईन पोलीस ठाण्यात दिल्यावर, पोलिसांनी अनिल उर्फ लाल्या कुंचे यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल केला.
हिललाईन पोलीस ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख अनिल उर्फ लाल्या कुंचे यांच्यासह १० जणांवर मालमत्ता चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने, एकच खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित ढेरे यांनी मालमत्ता व साहित्य चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक।तपास करीत आहेत. गुन्हा दाखल झालेल्याना।अटक करण्याच्या मागणीने जोर पकडला असून बेघर झालेल्या रेखा कुंचे यांना उघडयावर झोपण्याची वेळ आली. तसेच मुलांची घरा अभावी शाळा बुडीत निघाल्याचे सांगून दोन वेळच्या जेवणाचे वांधे झाल्याचे रेखा कुंचे म्हणाल्या आहेत.