ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान, धन कधी?; निवडणुकीत कर्तव्य बजावणारे कर्मचारी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 02:08 AM2021-03-24T02:08:44+5:302021-03-24T02:09:12+5:30

१४३ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला झाले होते मतदान 

In Gram Panchayat elections, only respect, when money ?; Employees on election duty are upset | ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान, धन कधी?; निवडणुकीत कर्तव्य बजावणारे कर्मचारी नाराज

ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान, धन कधी?; निवडणुकीत कर्तव्य बजावणारे कर्मचारी नाराज

Next

सुरेश लोखंडे

ठाणे : जिल्ह्यातील १५८ पैकी १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ सदस्यांसाठी १५ जानेवारीला निवडणूक झाली. मात्र, त्याला आता दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊनही या निवडणुकीत काम केलेले अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांना मानधन मिळालेले नाही. यामुळे अशा दोन हजार ९०० अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कर्तव्य बजावण्याचा केवळ मान मिळाला, पण आता धनासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचा सूर आहे.

जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यात १४३ ग्रामपंचायतींच्या सदस्यांसाठी १५ जानेवारीला मतदान झाले आहे. एप्रिल ते डिसेंबरदरम्यान मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींमधील एक हजार ४७२ सदस्यांसाठी निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी चार हजार ३८ जणांनी उमेदवारी दाखल केली होती. यापैकी आठ ग्रामपंचायतींमधील ४१८ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ४७९ मतदान केंद्रांवर मतदान झाले. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रिंगणात दोन हजार ४१३ उमेदवार होते. या निवडणुकीसाठी दोन लाख ५० हजार ५०० मतदारांकरिता ४७९ मतदान केंद्रे होती. 

तीन हजार पोलिसांचा होता फौजफाटा
ग्रामपंचायत निवडणुकीवेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. त्यात ग्रामीण कार्यक्षेत्रात पाच उपअधीक्षकांसह दीड हजार पोलीस कर्मचारी, तर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पोलीस उपायुक्तांसह एक हजार पोलीस व अधिकारी असा सुमारे अडीच ते तीन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. या मनुष्यबळावर निवडणुका निर्विघ्नपणे पार पडल्या आहेत. 

जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला निवडणूक प्रक्रियेसाठी २१ हजारांचा निधी दिला होता. निवडणुकीआधी आठ हजार रुपये आणि त्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीला १३ हजारांचा निधी वाटप केला आहे. यात निधीतून मानधनाची रक्कम अधिकारी, कर्मचाऱ्यांना देणे शक्यच झाले नाही. या मानधनासह अन्य खर्च झालेली रक्कम तालुका पातळीवरून वेळेत मिळणे अपेक्षित आहे; पण या रकमेची काही तालुक्यांनीच मागणी केली आहे.

तालुकानिहाय आढावा
तालुका    ग्रामपंचायती    सदस्य 
मुरबाड    ४४    ३३८
ठाणे    ५    ५१ 
अंबरनाथ    २७     २४७ 
भिवंडी    ५६    ५७४ 
कल्याण    २१    २११
शहापूर    ५    ५१ 

Web Title: In Gram Panchayat elections, only respect, when money ?; Employees on election duty are upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.