ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या बुधवारी निवडणुका, तीन सरपंचांसाठी उमेदवारी अर्ज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 03:06 AM2018-09-25T03:06:25+5:302018-09-25T03:06:36+5:30
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, मुरबाड, शहापूर या तीन तालुक्यांमधील सात ग्रामपंचायतींच्या ७२ सदस्यांपैकी ३० सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित सदस्यांसाठी २६ सप्टेंबर रोजी निवडणुका आहेत.
ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी, मुरबाड, शहापूर या तीन तालुक्यांमधील सात ग्रामपंचायतींच्या ७२ सदस्यांपैकी ३० सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित सदस्यांसाठी २६ सप्टेंबर रोजी निवडणुका आहेत. यातील तीन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी उमेदवारी अर्जच प्राप्त झाले नाहीत. यामुळे तेथे सरपंचपदासाठी यावेळी मतदान होणार नाही.
भिवंडी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या १४ सदस्यांसाठी निवडणूक आहे. यातील दोन जागांसाठी नामनिर्देशनपत्रे आली नाहीत, तर ११ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित केवळ एका जागेसाठी येथे मतदान होईल. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यातही दोन ग्रा.पं.च्या निवडणुका हाती घेतल्या आहेत. यातील १६ सदस्यांपैकी एका जागेसाठी उमेदवारी प्राप्त झाली नाही, तर उर्वरित नऊ जागा बिनविरोध झाल्या. प्रत्यक्षात आता केवळ सहा जागांसाठी मतदान होईल. याशिवाय, शहापूर तालुक्यातील चार ग्रा.पं.पैकी एक पूर्णपणे बिनविरोध निवडून आली आहे. उर्वरित तीन ग्रामपंचायतींच्या ४२ सदस्यांपैकी १० सदस्य बिनविरोध झाले असून शिल्लक ३२ जागांसाठी मतदान होईल.