ग्रामीणमधील विद्यार्थी ‘आॅनलाइन’पासून दूर

By admin | Published: July 1, 2017 07:37 AM2017-07-01T07:37:22+5:302017-07-01T07:37:22+5:30

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी शहरी भागात आॅनलाइन प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना

Grameen students are far from 'online' | ग्रामीणमधील विद्यार्थी ‘आॅनलाइन’पासून दूर

ग्रामीणमधील विद्यार्थी ‘आॅनलाइन’पासून दूर

Next

जान्हवी मोर्ये ।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी शहरी भागात आॅनलाइन प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी व मुंबई उपनगरांतील महाविद्यालयांत प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांच्यासाठी बिर्ला कॉलेजमध्ये मार्गदर्शन केंद्र सुरूकरण्यात आले होते. असे असतानाही काही अडचणींमुळे ग्रामीण भागातील जवळपास ४० टक्के विद्यार्थी योग्य प्रकारे आॅनलाइन प्रवेशअर्ज भरू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाचा प्रश्न तूर्तास तरी प्रलंबित राहणार आहे. त्यांना आणखी एक संधी दिली जाणार असल्याचे केंद्रातर्फे सांगण्यात आले.
ग्रामीण भागासाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया नाही. त्यामुळे मुंबई व शहरांतील महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळांकडून फॉर्म घेऊन व्हेरिफाय करायचे होते. मात्र, त्यांना त्याबाबत मार्गदर्शन मिळाले नव्हते. यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात जाऊन चौकशी करत होते. या विद्यार्थ्यांसाठी बिर्ला महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले होते. मार्गदर्शन व प्रवेशअर्ज भरणे, या दोन्ही प्रक्रिया होत्या. मात्र कोन, भिवंडी,शहापूर व मुरबाड, अन्य ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना अर्ज भरता आलेले नाही. आॅनलाइन प्रवेशाची तारीख १६ ते २९ जूनपर्यंत होती. प्रवेशाची मुदत संपल्यावर जवळपास ४० टक्के विद्यार्थी प्रवेश अर्ज आॅनलाइन प्रक्रियेद्वारे भरू शकले नाही. आॅनलाइन अर्ज भरण्याकरिता दिलेल्या साइटचा सर्व्हर डाउन झाल्याने प्रवेशप्रक्रिया एक दिवस पूर्णपणे बंद होती. परिणामी, त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला.
कल्याणच्या मुथा कॉलेजच्या प्राचार्या श्रुती वाईकर यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बिर्ला महाविद्यालयात प्रवेशाची सुविधा करण्यात आली होती. सीबीएसई व आयसीएसई या अभ्यासक्रमांतूून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेश फॉर्म भरावे लागत नाहीत. विशेषकरून प्रवेश अर्जात बायफोकल व त्याला पर्याय एमटीडीसी हा विषय आॅनलाइनमध्ये नमूद केला होता. हा पर्याय बायफोकलसाठी असल्याचे अनेक पालक व विद्यार्थ्यांना ते समजले नाही. त्यामुळे आॅनलाइन अर्ज भरताना तेथे अनेकांनी ‘नो’ हा पर्याय निवडला. एमटीडीसी हा विषय दहावीसाठी असल्याने पालकांचा गोंधळ उडाला. हा पर्याय बायफोकलसाठी असल्याने तो न समजल्याने ६० ते ७० टक्के पालकांसह विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे.

Web Title: Grameen students are far from 'online'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.