आजोबाचा नातीवर बलात्कार

By admin | Published: July 5, 2017 06:26 AM2017-07-05T06:26:50+5:302017-07-05T06:26:50+5:30

बदलापूरातील एका आजोबाने आपल्या सख्या नातीवरच शनिवारी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपी

Grandfather raped | आजोबाचा नातीवर बलात्कार

आजोबाचा नातीवर बलात्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर: बदलापूरातील एका आजोबाने आपल्या सख्या नातीवरच शनिवारी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपी असलेल्या आजोबाला बदलापूर पोलिसांनी अटक केली आहे. आपटेवाडी परिसरात मुलगा आणि सुनेसोबत राहत असलेल्या आजोबाने हे माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले. हे कुटुंब इमारतीच्या बांधकामावर मजुरी करते. दोन महिन्यांपूर्वी जयपूर येथे असलेल्या मुलीने तिच्या मोठ्या मुलीला आपल्या वडिलांकडे पाठविले. ही मुलगी आपले आजोबा आणि मामांसोबत त्यांच्या घरात राहत होती. त्यांच्यासोबत मोलमजुरी देखील करीत होती. कामाच्या ठिकाणी तिचे आजोबा तिच्यासोबत अंगचटीला येण्याचा प्रयत्न करीत होते. आपल्या नातीला लग्नाकरिता बळजबरी करीत होते. शनिवारी १ जुलैला घरातील सर्व व्यक्ती मजुरीसाठी गेले. पण पीडित मुलगी तब्येत बरी नसल्याने घरीच थांबली. तिचे आजोबा हे मजुरीच्या कामावर गेले. मात्र तासाभरात ते पुन्हा घरी आले. नात घरात एकटीच असताना त्यांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यावर आजोबांनी तिला जबर मारहाण केली व ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडित मुलीने घरातून पळ काढून जयपूरला जाण्याकरिता कल्याण रेल्वे स्थानक गाठले. रात्रभर स्थानकातील वेटींग रुममध्ये काढल्यावर सकाळी ती वांद्रे स्थानकात पोहचली.
जयपूरला जाणाऱ्या गाडीची चौकशी करण्यासाठी ती पोलिसांकडे गेली असता पोलिसांना तिची अवस्था पाहून संशय आला. त्यांनी विश्वासात घेऊन विचारल्यावर घटना समोर आली.

अखेर झाली अटक

मुलीकडून या घटनेचा तपशील समजताच वांद्रे स्थानकातील पोलिसांनी बदलापूर पूर्व पोलिसांना कळवले.
बदलापूरमध्ये गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने घरी जाऊन आजोबांना अटक केली. त्याने या काळीमा फासणाऱ्या कृत्याची कबुली दिली.

Web Title: Grandfather raped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.