प्रबळ इच्छाशक्ती ! ७० वर्षांच्या आजी चक्क चालवतात ट्रॅक्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 01:30 AM2021-01-31T01:30:14+5:302021-01-31T07:09:27+5:30

केवळ मनाची तयारी आणि काम करण्याची इच्छाशक्ती असेल, तर तुम्ही कुठलेही काम करू शकता. याच दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर एका ७० वर्षीय आजीबाईने चक्क आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालवून शेतीची कामे करून तरुणांपुढे आगळावेगळा आदर्श ठेवला आहे.

Grandmother of 70 years drives a tractor | प्रबळ इच्छाशक्ती ! ७० वर्षांच्या आजी चक्क चालवतात ट्रॅक्टर

प्रबळ इच्छाशक्ती ! ७० वर्षांच्या आजी चक्क चालवतात ट्रॅक्टर

Next

भातसानगर - केवळ मनाची तयारी आणि काम करण्याची इच्छाशक्ती असेल, तर तुम्ही कुठलेही काम करू शकता. याच दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर एका ७० वर्षीय आजीबाईने चक्क आपल्या  शेतामध्ये ट्रॅक्टर चालवून शेतीची कामे करून तरुणांपुढे आगळावेगळा आदर्श ठेवला आहे.

आज महिला पुरुषांच्या बरोबरीने आहेत, असे आपण म्हणतो आणि ते खरंच आहे. या आजीबाईंनी आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालून शहापूर तालुक्यात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. मला हे येत नाही, ते येत नाही, असे म्हणून निराशा पदरी बाळगून जीवन जगणाऱ्यांना या आजीने आगळावेगळा संदेशच दिला आहे.    

शहापूर तालुक्यातील वेहलोळी गावातील लक्ष्मीबाई लक्ष्मण वेखंडे (७०) यांनी आपल्या शेतामध्ये स्वतः ट्रॅक्टर चालवून सर्वांना आश्यर्याचा धक्काच दिला. शेतात काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आणि समर्थपणे कुटुंब सांभाळण्याची जिद्द यांच्या जोरावर त्यांनी हे काम केले.

२००२ मध्ये पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाची धुरा समर्थपणे सांभाळत आपल्या मुलांना कार्यक्षम बनवले. एक मुलगी अंगणवाडी शिक्षिका, दुसरी ज्युनिअर कॉलेजची शिक्षिका आणि तिसरी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिका आहे, तर मुलगा माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून काम करतो. 

शेतकऱ्यांसमोर आगळावेगळा आदर्श
वेखंडे या मुलांना शिक्षण दिल्यानंतर येथेच थांबल्या नाहीत, तर त्या स्वतः ट्रॅक्टरवर बसून आपल्या  शेतीची कामे करत आहेत. आज पन्नाशी ओलांडली की, माणसांना व्याधी जडतात आणि निराशमय जीवन जगतात. मात्र, त्यांनी या सगळ्या गोष्टींना मूठमाती देऊन शेतीचे काम करत शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

Web Title: Grandmother of 70 years drives a tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.