दिव्यांगासाठी हजार रुपये अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:57 PM2018-03-27T23:57:36+5:302018-03-27T23:57:36+5:30

अंबरनाथ नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी ३ टक्के निधी राखून ठेवण्यात येतो. मात्र हा निधी खर्च होत नसल्याने नाराजीचा सूर होता

Grant of thousand rupees for Divyanga | दिव्यांगासाठी हजार रुपये अनुदान

दिव्यांगासाठी हजार रुपये अनुदान

Next

पंकज पाटील 
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी ३ टक्के निधी राखून ठेवण्यात येतो. मात्र हा निधी खर्च होत नसल्याने नाराजीचा सूर होता. आता पालिकेने ६० टक्यापेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या व्यक्तींना दरमहा एक हजार रुपये अनुदान देण्यास सुरूवात केली आहे. डिसेंबर पासून या योजनेला सुरूवात करण्यात आलेली आहे.
अंबरनाथ नगरपालिका दिव्यांगांसाठी कोणतेही ठोस कार्यक्रम राबवत नाही अशी तक्रार येत होती. मात्र दोन वर्षात पालिकेने दिव्यांगांसाठी विविध योजना राबवत ३ टक्के निधी खर्च करण्यास सुरूवात केली आहे. मात्र तरीही संपूर्ण निधीचा उपयोग करता येत नसल्याने पालिकेने आता सरकारी नियमानुसार दिव्यागांना दरमहा एक हजार रूपये अनुदान देण्याचे धोरण अवलंबले आहे. ६० टक्यापेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तीला हे अनुदान दिले जाते. ज्या दिव्यांगांनी पालिकेकडे नोंद केलेली आहे त्यांच्या बँक खात्यात हे अनुदान दर महिन्याला वर्ग करण्यात येते.
अंबरनाथमध्ये आजच्या घडीला २६८ दिव्यांगांना पालिकेच्या वतीने हे अनुदान दिले जाते. डिसेंबरपासून ही योजना राबवण्यात येत असून मार्च महिन्यात चार महिन्यांचे अनुदान एकाच महिन्यात वर्ग करण्यात आले आहे. तर एप्रिलपासून दर महिन्याला बँक खात्यात हे पैसे जमा होतील. अंबरनाथ नगरपालिकेने ठराव करून हे अनुदान देण्यास मान्यता दिली होती. या सोबत इतर दिव्यांगांनाही योजनेचा लाभ व्हावा यासाठी पालिका प्रयत्न करत आहे.
दिव्यांगांना अनुदान देण्यासोबत आता पालिकेने अंबरनाथ शहरातील सर्व शाळेतील प्रत्येक दिव्यांगाला अनुदान देण्याची मोहीम हाती घेतली आहे. शहरात शिक्षण घेणाऱ्या आणि राहणाºया प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. आजच्या घडीला ३७९ च्या वर दिव्यांग विद्यार्थांची नोंद असून त्यात आणखी भर पडणार आहे. या प्रत्येक विद्यार्थ्यांनाही पालिकेकडून आर्थिक आणि साहित्यांचे वाटप केले जाणार आहे.

Web Title: Grant of thousand rupees for Divyanga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.