ट्रॅकशेजारील कचऱ्याला आग, मध्य रेल्वेची ठाणे-कल्याण धीम्या मार्गावरील वाहतूक बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 18:04 IST2020-02-14T17:28:31+5:302020-02-14T18:04:27+5:30
कळवा स्थानकाजवळ रेल्वे रुळांशेजारी असलेले गवत आणि कचऱ्याला आग लागली आहे.

ट्रॅकशेजारील कचऱ्याला आग, मध्य रेल्वेची ठाणे-कल्याण धीम्या मार्गावरील वाहतूक बंद
ठाणे - कळवा स्थानकाजवळ रेल्वे रुळांशेजारी असलेल्या कचऱ्याला आग लागली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वेचीठाणे-कल्याणदरम्यानची धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक बंद करण्यात आली आहे. संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी ही आग लागल्याने घरी निघालेल्या चाकरमान्यांचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा होण्याची शक्यता आहे.
कळवा रेल्वे स्टेशनपासून जवळच असलेल्या शिवाजीनगर येथील नाल्यातील कचऱ्याल संध्याकाळच्या सुमारास आग लागली. काही वेळात ही आग मोठ्या प्रमाणावर भडकली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.