‘अनुभवाला कवितेचे अस्तर असलेले लेखन ग्रेटच’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 01:00 AM2019-12-09T01:00:54+5:302019-12-09T01:01:11+5:30

कथा, कादंबरी, ललित अशा विविध प्रकारांत लेखन करताना त्यामधील अनुभवविश्व कवितेच्या पातळीवरचे असेल, तर ती कलाकृती वाचकांच्या स्मरणात राहते.

'Great poetry writing poetic experience' | ‘अनुभवाला कवितेचे अस्तर असलेले लेखन ग्रेटच’

‘अनुभवाला कवितेचे अस्तर असलेले लेखन ग्रेटच’

Next

ठाणे : कथा, कादंबरी, ललित अशा विविध प्रकारांत लेखन करताना त्यामधील अनुभवविश्व कवितेच्या पातळीवरचे असेल, तर ती कलाकृती वाचकांच्या स्मरणात राहते. प्रत्येक अनुभवाला कवितेचे अस्तर असेल, तर ते लेखन ग्रेटच म्हणावे लागेल, असे मत ज्येष्ठ कवी, गीतकार अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केले.
कवयित्री, लेखिका मानसी कुलकर्णी हिच्या ‘मौनाची स्पंदने’ या पहिल्या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ शनिवारी तिच्याच राहत्या घरी पार पडला. यावेळी आपले मनोगत मांडताना म्हात्रे म्हणाले की, कवितेचा एक विशिष्ट प्रकारचा ग्राफ असतो. सर्वसाधारण विचार सारेच करीत असतात, मात्र त्याच्या पलीकडचा, पुढचा विचार करणे, स्वत:मधला बदल समजून येणे, शब्दांमध्ये रमताना साक्षात्कार होणे, ही सर्व जातिवंत कवीची लक्षणे होत.

कवितालेखन करताना स्वत:ला सूर सापडणे, नेमका शब्द सापडणे म्हणजे अवघड गोष्ट. मात्र, ही किमया मानसीला उत्तम साधली आहे, असेही ते शेवटी म्हणाले. यावेळी त्यांनी या संग्रहातील ‘परतीच्या वाटेवर अजूनही’ ही कविता वाचून दाखवली. मानसी मनोगतात म्हणाली की, या संग्रहनिर्मितीचे सारे श्रेय माझ्या आईला देते. माझी आई ही माझ्या कवितेची पहिली रसिक, वाचक आणि टीकाकार आहे. व्यास क्रि एशन्सचे संचालक निलेश गायकवाड प्रास्ताविकेत म्हणाले, मानसीच्या शब्दांमध्ये, विषयांमध्ये वैविध्य आहे.

तरुणाईची भाषा तिला नेमकी समजली आहे. यावेळी व्यास क्रि एशन्सचे मार्गदर्शक श्री.वा. नेर्लेकर, मानसीची आई कवयित्री आरती कुलकर्णी, बाबा राघव कुलकर्णी हे उपस्थित होते. या संग्रहातील मानसीच्या कवितांचे वाचन अनेक मंडळींनी केले. या कार्यक्रमाला लेखिका, अनुवादक जयश्री देसाई, रामदास खरे, मेधा सोमण, निवेदिका साधना जोशी, मेघना साने, दीपा ठाणेकर, मनीषा चव्हाण, साधना ठाकूर, अंजुषा पाटील, वृषाली शिंदे, गीतेश शिंदे, सदानंद राणे, बाळ कांदळकर व इतर उपस्थित होते. मानसीच्या ‘आकाश कवेत घेताना’ या आत्मकथन पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद लवकरच आम्ही प्रकाशित करणार आहोत, असे गायकवाड यांनी शेवटी जाहीर केले. महापौर नरेश म्हस्के यांनी शेवटी मानसीला शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन कवयित्री नीता माळी यांनी केले, तर आरती कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: 'Great poetry writing poetic experience'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.