ठाणे जिल्ह्याला मोठा दिलासा, रुग्णसंख्या चारशेच्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:27 AM2021-06-22T04:27:01+5:302021-06-22T04:27:01+5:30
ठाणे : ठाणे जिल्ह्यात सोमवारी ३६३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात आता पाच लाख २८ हजार ४८९ ...
ठाणे : ठाणे जिल्ह्यात सोमवारी ३६३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात आता पाच लाख २८ हजार ४८९ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या १० हजार ५२७ झाली आहे. विशेष म्हणजे दिवसभरात ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि बदलापूरमध्ये एकही मृत्यूची नोंद नाही. तसेच रुग्णसंख्या चारशेच्या खाली आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.
ठाणे शहर परिसरात ८६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता एक लाख ३२ हजार ४३१ झाली आहे. शहरात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर कल्याण-डोंबिवलीत ९६ रुग्णांची वाढ झाली असून मृत्यूची नोंद नाही. नवी मुंबईत ६९ रुग्णांची वाढ झाली असून चार मृत्यूंची नोंद आहे. उल्हासनगरमध्ये नऊ रुग्ण सापडले असून एका मृत्यूची नोंद आहे. भिवंडीत एक बाधित असून मृत्यूची नोंद नाही. मीरा-भाईंदरमध्ये ४४ रुग्ण आढळले असून तीन मृत्यू झाले. अंबरनाथमध्ये १० रुग्ण आढळले असून मृत्यूची नोंद नाही. बदलापूरमध्ये १४ रुग्णांची नोंद असून मृत्यूची नोंद नाही. ठाणे ग्रामीणमध्ये ३४ नवे रुग्ण वाढले असून दोन मृत्यूंची नोंद आहे. आता बाधित रुग्णसंख्या ३८ हजार ७९० झाली असून आतापर्यंत एक हजार १६८ मृत्यूंची नोंद झाली आहे.