मॅरेथॉन व आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद
By admin | Published: January 9, 2017 05:58 AM2017-01-09T05:58:52+5:302017-01-09T05:58:52+5:30
मनोर पोलीस ठाण्यात रायझिंग डे निमित्त आयोजिलेल्या मॅरेथॉन व आरोग्य शिबीरास उत्तम प्रतिसाद मिळाला.
मनोर : मनोर पोलीस ठाण्यात रायझिंग डे निमित्त आयोजिलेल्या मॅरेथॉन व आरोग्य शिबीरास उत्तम प्रतिसाद मिळाला.
पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, महिला दक्षता कमिटी यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालयात वजन, रक्तदाब,मधुमेह, ई सी जी तसेच अस्थमा , डोळे , दातांची तपासणी करण्यात आली तिचा १८० रुग्णांनी लाभ घेतला त्यावेळी उत्तम आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचारी तसेच रुग्णवाहिकेचे चालक बिलाल रईस, नदीम दळवी यांना अप्पर पो अधीक्षक यशोद यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सरपंच जागृती हेमाडे, उपसरपंच साजिद खतीब, निमित्त गोयल उप पो अधिकारी, गणेश धुमाळ वैद्यकीय अधीक्षक व निगार बेग, सिद्धी विनायक मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटल तसेच सिप्ला कंपनी व मनोर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शिबीर यशस्वी पार पाडले.
मॅरेथॉनला सहायक पोलिस अधिक्षक गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरवात केली. यावेळी स्त्री गटात सरिता देऊ पाडेकर पहिल्या, द्वितीय तेजू संताराम लाखात, मैना काशिनाथ काटेला तिसऱ्या आल्यात. विद्याथी गटात पहिला क्र मांक किरण जयराम पुंजारा, द्वितीय प्रदीप नरसू वेडगे, तिसरा निलेश लक्ष्मण वाझे आलेत. पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच गटात प्रथम कुणाल गोपीनाथ पाटील, द्वितीय गुरुनाथ ठक्या सांबरे तृतीय लक्ष्मण गोवऱ्या वावरे आलेत. विजेत्यांना निमित्त गोयल, स पो नि मनोज चाळके, मुख्यधापक नरेश जाधव, सरपंच इंदिरा तांबडी, पवन स्वरा , कुमावतांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व लोकमत कालदर्शिकाही देण्यात आली. अक्षय सोनावणे, डी सोनावणे, पंकज पाटील व भोरे, चोघे उपपोलीस निरीक्षकांनी तसेच कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. (वार्ताहर)