सहाव्या वर्षीही ग्रीन गटारी उपक्रम साजरा, येऊर इन्व्हॉर्नमेंटल सोसायटीतर्फे मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 03:24 PM2020-07-20T15:24:23+5:302020-07-20T15:29:42+5:30

येऊर इन्व्हॉर्नमेंटल सोसायटीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर पाच वर्षानी येऊरच्या जंगलाच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे.

Green Gutter Initiative Celebrated for the Sixth Year, Campaign by Yeoor Environmental Society | सहाव्या वर्षीही ग्रीन गटारी उपक्रम साजरा, येऊर इन्व्हॉर्नमेंटल सोसायटीतर्फे मोहीम

सहाव्या वर्षीही ग्रीन गटारी उपक्रम साजरा, येऊर इन्व्हॉर्नमेंटल सोसायटीतर्फे मोहीम

Next
ठळक मुद्देग्रीन गटारी म्हणून ओळखला जाणारा हा उपक्रम यंदा सलग 6 व्या वर्षीही साजरा झाला.

ठाणे : गेल्या काही वर्षात ठाण्यात विशेषत: येऊरच्या निसर्गरम्य वातावरणात गटारी साजरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने कचरा, प्लास्टिकने निसर्गाची मोठी हानी होऊ लागली आहे. याचा परिणाम पर्यावरणावर, येथील वन्यजीवांवर होतो. हे लक्षात घेत वन्यजीवांची फोटोग्राफी करणा-या तरूणांनी येऊर इन्व्हॉर्नमेंटल सोसायटीच्या नावाखाली एकत्र येऊन स्वच्छता मोहीम सुरू केली. ग्रीन गटारी म्हणून ओळखला जाणारा हा उपक्रम यंदा सलग 6 व्या वर्षीही साजरा झाला.

येऊर इन्व्हॉर्नमेंटल सोसायटीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर पाच वर्षानी येऊरच्या जंगलाच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे. जंगलात प्लास्टिक किंवा बाटल्या अभावानेच दिसतात. पोलिसांच्या कारवाईमुळे पार्ट्यांना येणाऱ्यांची नाकाबंदी होते. यंदा तर कोरोनामुळे जंगलात पार्ट्या बंद होत्या. कच-याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालंय. जंगलात पुन्हा एकदा नैसर्गिक शांतता नांदू लागली आहे, याचे समाधान असल्याचे येऊर इन्व्हॉर्नमेंटल सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर येऊर इन्व्हॉर्नमेंटल सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक भान राखत येऊरच्या गस्तीमध्ये भाग न घेण्याचे आवाहन केले आहे.

‘येऊर की आवाझ’ रॅप गाणं प्रसिद्ध
गेल्या 5 वर्षाच्या मोहिमेत खंड पडू नये म्हणून पर्यावरण संवर्धन व संरक्षणाच्या जनजागरणासाठी तसेच तरुणाईचे लक्ष या गोष्टींकडे आकर्षित करण्यासाठी एक रॅप गाणो प्रसिद्ध केले आहे. ‘येऊर की आवाझ’ असे गाण्याचे नाव असून त्याची निर्मिती हिरण्यगर्भ सेवा संस्थेने केली आहे. गायक ऋतुराज सावंत रॅपर आहेत तर आदित्य सालेकर दिग्दर्शक आहे. गाण्याचे लोकार्पण संगीत दिग्दर्शक पियुष मिश्र यांच्यातर्फे करण्यात आले. याचबरोबर ‘येऊर ग्रीन लंग्स ऑफ ठाणे’ या माहितीपटाची सुद्धा निर्मिती हिरण्यगर्भ सेवा संस्था यांच्याकडून करण्यात आली आहे. येऊर इन्व्हॉर्नमेंटल सोसायटीच्या माध्यमातून गेले पाच वर्षे सुरू असलेले उपक्रम यात दाखवले आहेत.

आणखी बातम्या...

CoronaVirus News : धक्कादायक! मल्टीनॅशनल कंपनीत कोरोनाचा विस्फोट, २८८ कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह

दूध आंदोलनाला राज्यात सुरुवात, दगडाला अभिषेक घालून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण    

रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा    

सरकारी कर्मचार्‍यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...   

Web Title: Green Gutter Initiative Celebrated for the Sixth Year, Campaign by Yeoor Environmental Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे