पतीदेवांना तोंडपाठ नाही गृहलक्ष्मीचा मोबाइल नंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:25 AM2021-07-09T04:25:37+5:302021-07-09T04:25:37+5:30
साठीनंतरच्या पुरुषांना मात्र मोबाईल नंबरचे समरण लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : हातात स्मार्टफोन आल्याने बहुतांश पतीदेवांना आपल्या पत्नीचा अर्थात ...
साठीनंतरच्या पुरुषांना मात्र मोबाईल नंबरचे समरण
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : हातात स्मार्टफोन आल्याने बहुतांश पतीदेवांना आपल्या पत्नीचा अर्थात गृहलक्ष्मीचा मोबाइल नंबर तोंडपाठच नसल्याचे आढळून आले आहे. या पतीदेवांना पत्नीचा मोबाइल नाही, परंतु, जुने लँडलाइन नंबर आणि जुन्या मित्रांचे नंबर मात्र पाठ असल्याचे त्यांनी सांगितले. पंचेचाळीशीतले पुरुष मात्र पत्नीच्या भीतीपोटी नंबर पाठ करावा लागतो असेदेखील म्हणाले. विशेष म्हणजे तरुणांना आपल्या पत्नीचा नंबर पाठ नसला तरी ज्येष्ठांना मात्र नंबर पाठ असल्याचे आढळून आले.
‘लोकमत’@ टेम्भीनाका
१. पन्नाशीतल्या पुरुषाने सांगितले, पूर्वी मोबाइल नव्हते तेव्हा १०० नंबर पाठ करायचो. आता मोबाइलमुळे स्वतःचाच नंबर पाठ नाही, बायकोचा नंबर काय पाठ करणार.
२. पंचेचाळीशीतल्या एका पुरुषाने सांगितले, पत्नीचा नंबर भीतीपोटी लक्षात ठेवावा लागतो.
३. चाळीशीतला पुरुष म्हणाला, पत्नीच्या घरचा जुना लँडलाइन नंबर लक्षात आहे, पण आता मोबाइल नंबर लक्षात नाही, मला स्वतःचा नंबर सोडून कोणाचाच लक्षात राहत नाही.
४. तिशी ओलांडलेला तरुण म्हणाला, मला माझ्या वडिलांचा नंबर पाठ आहे, पण पत्नीचा नंबर पाठ नाही आणि माझ्या पत्नीला पण माझा नंबर पाठ नाही.
५. साठी ओलांडलेल्या पुरुषांनी सांगितले, पत्नीचा नंबर आम्हाला वर्षानुवर्षे पाठ आहे आणि ते अंगवळणी पडले आहे.
----------------------
साठी ओलांडलेल्या पुरुषांना आपल्या पत्नीच्या मोबाइल नंबरचे स्मरण आहे. मात्र, ३० ते ५० वयोगटातील बहुतांश पुरुषांना आपल्या पत्नीचा नंबर तोंडपाठ नसल्याचे सर्व्हेक्षणात आढळून आले.
----------------------
पतीदेवाप्रमाणे बहुतांश बायकांनाही आपल्या पतीचा नंबर स्मरणात राहत नाही. पतीचा नंबर त्यांना मोबाइलमध्ये शोधावा लागतो, असे त्यांनी सांगितले.
--------------------------