वाढवणचे भिजत घोंगडे

By admin | Published: August 20, 2016 04:32 AM2016-08-20T04:32:42+5:302016-08-20T04:32:42+5:30

वाढवण बंदर उभारण्यावरून वर्षभरापासून वाद सुरू आहेत. यावर तोडगा काढण्यासाठीच मुख्यमंत्री आणि संघर्ष समिती यांची शुक्रवारी (१९ आॅगस्ट) होणारी बैठक रद्द झाल्याची

Grinding Wheels | वाढवणचे भिजत घोंगडे

वाढवणचे भिजत घोंगडे

Next

डहाणू : वाढवण बंदर उभारण्यावरून वर्षभरापासून वाद सुरू आहेत. यावर तोडगा काढण्यासाठीच मुख्यमंत्री आणि संघर्ष समिती यांची शुक्रवारी (१९ आॅगस्ट) होणारी बैठक रद्द झाल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिल्याने आता हा प्रश्न असाच प्रलंबित राहणार आहे.
एकीकडे हे बंदर उभारण्याची शासनाची जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे या बंदराला विरोध करण्यासाठी वाढवण परिसरातील २५ ते ३० गावातील लोक आक्रमक झाले असून त्यांनी बंदराविरोधात प्राणपणाने लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी बैठक रद्द केल्याने बंदर विरोधक आणि येथील जनता अधिकच आक्रमक होऊन ते मुख्यमंत्र्यानी येथे येऊन चर्चा करावी अशी आमची मागणी असल्याचे वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी संगितले.
वर्षभरा पासून वाढवण बंदर उभारणीचा प्रश्न धगधगत असून या बंदरामुळे शेतकरी, डायमेकर्स,बागायतदार, मच्छीमार यांचे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. एका बाजूला तारापुर अणुशक्ती केंद्र तर दुसऱ्या बाजूला रसायनिक कारखाने असलेली एमआयडीसी तसेच औष्णिक विद्युत केंद्र आणि केवळ ३५० किमी अंतरावरील कराची बंदरामुळे राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीनेही हा भाग फार महत्त्वाचा आहे. हे बंदर झाल्यास भूकंप वादळे यांना आमंत्रण देऊन नैसिर्गक आपत्ती ओढवून घेतल्यासारखे होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावांचे विस्थापन त्याच बरोबर रेल्वे, चौपदरी रस्त्यासाठी तसेच कर्मचारी वसाहत गोडाऊनसाठी जमीन संपादन केल्यास इथला शेतकरी देशोधडीला लागेल. येथील समुद्र हा माशांनी समृद्ध आहे. माशांचे प्रजोत्पादन होणारे हे एकमेव ठिकाण आहे.

लॉब्टर (शिवंड) हा दुर्मिळ मासा याच ठिकाणी मिळतो. पण बंदर झाल्यास हे नैसर्गिक वैभव नष्ट होण्याी भीती आहे. त्यामुळे येथील सर्व समाज आक्र मक होऊन या बंदराला विरोध करीत आहेत. शिवाय, बंदरासाठी गावांचे देखील विस्थापन होणार आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता बाधितांचे पुनर्वसन योग्य रित्या होत नाही. परिणामी, ग्रामस्थ भलतेच आक्रमक झाले आहेत.

Web Title: Grinding Wheels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.