धामणशेत येथे भीषण पाणीटंचाई

By admin | Published: April 21, 2016 02:02 AM2016-04-21T02:02:50+5:302016-04-21T02:02:50+5:30

तालुक्यातील धामणशेत कोशीमशेत गृप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या धामणशेत ठाकूरपाडा, पाटीलपाडा या गावपाड्यांना भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

Groundwater shortage at Dhamshet | धामणशेत येथे भीषण पाणीटंचाई

धामणशेत येथे भीषण पाणीटंचाई

Next

रवींद्र साळवे,  मोखाडा
तालुक्यातील धामणशेत कोशीमशेत गृप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या धामणशेत ठाकूरपाडा, पाटीलपाडा या गावपाड्यांना भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गाव पाड्यांची एकत्रीत लोकसंख्या एक हजाराच्या आसपास आहे. या गावपाड्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीनी तळगाठल्यामुळे पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या मागणीचा प्रस्ताव ५ एप्रिल रोजी तहसील कार्यालय व पंचायत समिती याच्याकडे ग्रामपंचायतीकडून पाठवण्यात आला आहे. परंतु अद्यापपर्यंत टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला नसल्याने आदिवासींना घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, असे येथील ग्रामस्थानी लोकमतला सांगितले. तसेच तालुक्यातील सर्वच गावपाड्यांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असुन पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे. जर वेळीच कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Web Title: Groundwater shortage at Dhamshet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.