गटशेतीचा फायदा झाला, मुख्यमंत्र्यांच्या 'विकेल ते पिकेल' कार्यक्रमात शेतकरी महिलेचा संवाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 06:58 PM2020-09-10T18:58:15+5:302020-09-10T18:58:28+5:30

शहापूर तालुक्यातील चार शेतकर्‍यां पैकी  या जानकी बाईंनी मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधला आणि आपल्या गट शेतीचे महत्त्व पटवून दिले, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी सांगितले.

Group farming has benefited, the dialogue of a farmer woman in the Chief Minister's 'Vikel to Pickel' program in thane | गटशेतीचा फायदा झाला, मुख्यमंत्र्यांच्या 'विकेल ते पिकेल' कार्यक्रमात शेतकरी महिलेचा संवाद 

गटशेतीचा फायदा झाला, मुख्यमंत्र्यांच्या 'विकेल ते पिकेल' कार्यक्रमात शेतकरी महिलेचा संवाद 

googlenewsNext

ठाणे : गट शेती करीत असल्यामुळे सिंचनाची व्यवस्था झाली. त्यामुळे भेंडी, मिरची गवार भाजीचे मोठ्याप्रमाणात गेल्यावर्षी उत्पन्न घेतले. याशिवाय ट्रक्टर आणि शेततळ्याचा लाभ झाल्याचे वास्तव शहापूर तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी जानकी तुकाराम बगळे यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्याशी 'विकेल ते पिकेल' या कृषी विभागाच्या आँनलाइन कार्यक्रमात संवाद साधून स्पष्ट केले.             
        
शहापूर तालुक्यातील चार शेतकर्‍यां पैकी  या जानकी बाईंनी मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधला आणि आपल्या गट शेतीचे महत्त्व पटवून दिले, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी सांगितले. या आधी रानभाज्या विकून या शेतकर्‍यांचा उदर निर्वाह होत असे. कृषी विभागाने त्यांना 'विकेल ते पिकेल' कार्यक्रमात सहभागी करुन घेत यंदा त्यांच्या रान भाज्यांचे प्रदर्शन कल्याण व ठाणे येथे भरवून तब्बल 20 हजार रुपयांच्या रान भाज्यांची विक्री झाल्याचे बगळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले. गट शेती केल्यामुळे आर्थिक फायदा होत आहे. आता त्यांच्या गटाकडून जिल्ह्यातील शहरांना ताजा भाजीपाला व रानभाज्या पुरवण्याचे निश्चित केल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. 

शहापूर जवळील अंदाडच्या रासदो पाडा येथील या जानकीबाई आहे.  यांच्या 100 एकरचा गट आहे. त्या एका कंपनीशी संलग्न होऊन गट शेती करतात. 70 एकरच्या गटात त्या भेंडी, काकडी, कारले, दोडके, मिरची, मेथी, वांगी आदी भाजीपाला व रान भाज्याचे उत्पन्न घेतात. वर्षाकाठी लाख रुपये लाभ होत आहे. या गट शेतीमुळे त्यांनी तीन शेततळी मंजूर झाले आहेत. त्यांना दोन ट्रक्टर विकत घेता आले. रान भाज्या वाळून, सुकवून त्या 20 वर्षांपासून विकत आहे. रान भाज्यांचे आयुर्वेदिक महत्व शहरी भागात पटवून दिल्यामुळे त्याचे ग्राहक वाढले आहेत.
 

Web Title: Group farming has benefited, the dialogue of a farmer woman in the Chief Minister's 'Vikel to Pickel' program in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.