१९ हजार ८५५ पोलिसांचा जागता पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 01:16 AM2019-04-26T01:16:07+5:302019-04-26T01:16:42+5:30

ठाणे शहरासाठी १६,१५४, तर ग्रामीणसाठी ३७०१ पोलिसांचा फौजफाटा, बीएसएफ, सीआरपीएफ आणि आयआरबी तुकड्याही तैनात

The guard of the 19 thousand 855 police | १९ हजार ८५५ पोलिसांचा जागता पहारा

१९ हजार ८५५ पोलिसांचा जागता पहारा

Next

- जितेंद्र कालेकर

ठाणे : ठाणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे शहर आणि ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक शांततेत आणि सुरक्षिततेच्या तसेच निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या सात कंपन्यांसह महाराष्टÑाच्या इतर जिल्ह्यांतील फौजफाटाही तैनात केला आहे. अनुचित घटनेच्या वेळी अवघ्या काही मिनिटांमध्ये प्रतिसाद देण्यासाठी पोलिसांकडून व्यूहरचना केल्याची माहिती सूत्रांंनी दिली.

ठाणे शहर आणि ग्रामीण या दोन्ही पोलीस विभागांमध्ये ठाणे, कल्याण आणि भिवंडी हे तीन मतदारसंघ येतात. ठाणे शहर, मीरा-भार्इंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर या पाच महापालिकांसह ठाणे जिल्हा परिषदेचा परिसर या दोन्ही विभागांमध्ये आहे.

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये पूर्वी काही हिंसक घटनांचे गुन्हे घडलेली ६३ संवेदनशील मतदानकेंदे्र आहेत. यातील बहुतांश म्हणजे भिवंडीमध्ये ७५ टक्के मतदानकेंद्रे संवेदनशील आहेत. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या तिन्ही मतदारसंघांत ४२३ क्रिटिकल केंदे्र आहेत. या सर्वच ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांमध्ये पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांच्या अधिपत्याखाली ११ पोलीस उपायुक्त, २२ सहायक पोलीस आयुक्त, १२२ निरीक्षक, ४६० सहायक निरीक्षक तसेच उपनिरीक्षक आणि ६२५० पोलीस कर्मचारी याशिवाय, ३७०० गृहरक्षक दलाचे जवान असा स्थानिक बंदोबस्त आहे. याव्यतिरिक्त परजिल्ह्यातील दोन उपायुक्त, सात सहायक पोलीस आयुक्त, २० निरीक्षक, ११० उपनिरीक्षक, १२५० कॉन्स्टेबल आणि ३५०० गृहरक्षक दलाचे जवान तैनात राहणार आहेत.

त्यांच्या मदतीसाठी केरळ राज्यातील इंडियन रिझर्व्ह बटालियन (आयआरबी) च्या दोन कंपन्या (एका कंपनीमध्ये १०० जवान), सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तीन आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन अशा १० कंपन्यांचा समावेश आहे.

ठाणे ग्रामीण पोलीस दलातही पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या अधिपत्याखाली दोन अपर अधीक्षक, पाच उपअधीक्षक, २३ पोलीस निरीक्षक, एपीआय तसेच उपनिरीक्षक १६१, पोलीस कर्मचारी २३०८, गृहरक्षक दलाचे जवान ९००, तीन केंद्रीय सुरक्षा दलाच्या कंपन्या तसेच सोलापूर येथून ४००, तामिळनाळूचे १०० आणि सिंधुदुर्ग येथून १०० असा पाच हजार ३६१ चा फौजफाटा तैनात राहणार आहे. ठाणे ग्रामीणमध्ये २३४ क्रिटिकल मतदान केंदे्र असून त्याठिकाणी विशेष लक्ष केंद्रित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मतदान निर्भय वातावरणामध्ये पार पडण्यासाठी संपूर्ण पोलीस आयुक्तालयातच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. एका परिमंडळासाठी सुमारे साडेतीन कंपन्या आहेत. नाकाबंदी आणि कोम्बिंग आॅपरेशनद्वारेही अनेक गुंडांना पकडण्यात आले आहे.
- विवेक फणसळकर,
पोलीस आयुक्त, ठाणे शहर

ठाणे ग्रामीणमध्ये १५१७ मतदानकेंद्रे आहेत. त्यात २३४ क्रिटिकल आहेत. बंदोबस्ताची तयारी पूर्ण झाली आहे. कुठेही अनुचित घटना घडलीच, तर तत्काळ प्रतिसादासाठी सेक्टर पेट्रोलिंग ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मीरा-भार्इंदरसारख्या शहरातही अवघ्या चार ते पाच मिनिटांमध्ये पोलीस घटनास्थळी येऊन कार्यवाही करतील.
- डॉ. शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक, ठाणे

Web Title: The guard of the 19 thousand 855 police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.