पालकमंत्र्यांनी अनुभवली ‘व्हिंटेज कार’ची सफर; ठाण्यात आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 01:23 AM2021-01-28T01:23:55+5:302021-01-28T01:24:09+5:30

रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत ठाणे आणि मुंबई वाहतूक पोलीस तसेच रेमंड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने या व्हिंटेज कार रॅलीचे आयोजन केले होते

The Guardian experienced a ‘vintage car’ trip; Organized in Thane | पालकमंत्र्यांनी अनुभवली ‘व्हिंटेज कार’ची सफर; ठाण्यात आयोजन

पालकमंत्र्यांनी अनुभवली ‘व्हिंटेज कार’ची सफर; ठाण्यात आयोजन

Next

ठाणे : मॅकलरेन, फेरारी, लॅम्बोर्गिनी, रोल्स रॉयल्स, बेन्टले, फोर्ड आणि हडसन अशा एकापेक्षा एक नामवंत मोटारी आणि ट्रिम्फ, बीएसए, हार्ले डेव्हिडसन आणि रॉयल इनफिल्ड यासारख्या मोटारसायकलींनी प्रजासत्ताकदिनी ठाणेकरांचे लक्ष वेधले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या व्हिंटेज कार सफारीचा यावेळी अनुभव घेतला.

रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत ठाणे आणि मुंबई वाहतूक पोलीस तसेच रेमंड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने या व्हिंटेज कार रॅलीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाप्रसंगी रेमंडचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते. वांद्रे कुर्ला संकुलातून सुरू झालेल्या या सुपर कार ड्राइव्हची सांगता ठाण्यातील रेमंड मैदानावर झाली. त्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यावेळी शिंदे म्हणाले की, रस्ते सुरक्षा ही काळाची गरज आहे. वाहतूक पोलीस त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत. परंतु, नागरिकांनीही नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. रस्ता सुरक्षा अभियानाचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

गौतम सिंघानिया म्हणाले की, या कार रॅलीचे आयोजन केल्याबद्दल मोटारप्रेमी म्हणून आपल्याला नक्कीच ही अभिमानाची बाब आहे. ठाणेकरांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरल्याचेही ते म्हणाले. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक व्हिंटेज कारप्रेमी यावेळी उपस्थित होते.

Web Title: The Guardian experienced a ‘vintage car’ trip; Organized in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.