पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाच शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 01:37 AM2017-09-24T01:37:56+5:302017-09-24T01:37:59+5:30
ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या पाच शिक्षकांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या पाच शिक्षकांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. येथील पोलीस स्कूल शाळेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
यात दीपश्री मनोहर इसामे (मुरबाड), चिंतामण काळुराम वेखेंडे (शहापूर), गजेंद्र बुधाजी वेखेंडे (कल्याण), श्रीकृष्ण लोटू नेमाडे (भिवंडी), राजश्री ललित चौधरी (अंबरनाथ) या शिक्षकांना यंदाचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन पालकमंत्र्यांनी गौरवले.
या वर्षी ज्योती दीपक बेलवले (केवणी, ता. भिवंडी) यांना राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. तसेच नूतन आलोक पांडे (कल्याण), नथू माधवराव भामरे (रायते, कल्याण), हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर (शेलवंली, शहापूर), मंगल गुणेश डोईफोडे (देसलेपाडा, शहापूर) यांना राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला. या सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचाहीदेखील या वेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, शिक्षणाधिकारी मीना यादव, पोलीस स्कूलच्या प्राचार्या स्मिथा नायर, गटशिक्षणाधिकारी आशीष झुंजारराव, मधुकर गोरड आदी मान्यवर उपस्थित होते.