पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना जामीन

By admin | Published: August 6, 2015 01:22 AM2015-08-06T01:22:32+5:302015-08-06T01:22:32+5:30

दुर्गाडी घंटानाद आंदोलन प्रकरणात समन्स बजावलेले ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या

Guardian Minister Eknath Shinde has been granted bail | पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना जामीन

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना जामीन

Next

कल्याण : दुर्गाडी घंटानाद आंदोलन प्रकरणात समन्स बजावलेले ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. तसेच त्याच्या विनंतीवरून पुढील तारखेच्या सुनावणीला अनुपस्थित राहण्याची मुभादेखील दिली.
२००६ मध्ये बकरी ईददिनी दुर्गाडी किल्ला येथे शिवसेनेच्या वतीने झालेल्या घंटानाद आंदोलनात शिंदे यांच्यासह ११५ शिवसैनिकांना अटक झाली होती. जमावबंदीचा आदेश मोडणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आदी गुन्हे त्यांच्यावर झाले होते. दरम्यान, या प्रकरणी कल्याण न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले असून आंदोलनकर्त्यांना हजर राहणेकामी समन्स बजावले होते.

Web Title: Guardian Minister Eknath Shinde has been granted bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.